बोरगावात बाटली उभीच राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 05:18 PM2017-09-10T17:18:33+5:302017-09-10T17:21:01+5:30

Borgaon bottle will stand up! | बोरगावात बाटली उभीच राहणार!

बोरगावात बाटली उभीच राहणार!

Next
ठळक मुद्देदोन्ही दारु दुकानांना अभय आडव्या बाटलीसाठी कमी पडली मते

बोरगाव मंजू (जि. अकोला): बोरगाव मंजू येथील दारूची दोन दुकाने कायमस्वरूपी बंद व्हावी, यासाठी महिलांच्या लढ्याला अखेर अपयश आले. येथील दारुची दोन्ही दुकाने बंद व्हावी या महिलांच्या निवेदनातील मागणीनुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार, १० सप्टेंबर रोजी महिलांचे मतदान घेण्यात आले. यामध्ये दुकान सुरु ठेवण्याच्या बाजूने १५८ मते पडली, तर दुकान बंद करावे या बाजूने २३६३ मते पडली; परंतु दुकान कायमस्वरुपी बंद करण्यासाठी आवश्यक असलेला २६१६ चा आकडा गाठू न शकल्याने महिलांचा दारु बंदी विरुद्धचा हा लढा अपयशी ठरला.
बोरगाव मंजू शहरात १ एप्रिलपासून दारूची दुकाने बंद होती. त्यानंतर संबंधित विभागाने शहरातील बंद दुकाने स्थानांतर करून नव्याने सुरू केली होती. त्यावर गावातील दारू दुकाने कायम बंद झाली पाहिजे, त्यासाठी गाव दारूबंदी महिला व पुरुष संघर्ष समितीने प्रशासनाला निवेदन दिले होते.
दरम्यान, महिलांच्या प्राप्त निवेदनावरील २५ टक्के स्वाक्षरीची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये गावातील महिलांचा पुढाकार लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्यावतीने येत्या १० सप्टेंबर रोजी दारूबंदीसाठी निवडणूक घेण्यात आली. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत २६१६ महिलांनी मतदान केले. दुपारी ४ वाजतानंतर निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये उभ्या बाटलीला १५८, आडव्या बाटलीला २३६३ मते पडली. यापैकी ९५ मते बाद ठरली. दुकान कायमस्वरुपी बंद करण्यासाठी गावातील एकून महिला मतदारांपैकी २८२२ महिलांची मते असणे गरजेचे होते. परंतु, तेवढे मतदान न झाल्यामुळे गावातील दारुची दोन्ही दुकाने सुरु राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणूक प्रक्रिया पार करण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने मोलाची भूमिका बजावली.

Web Title: Borgaon bottle will stand up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.