भारिप-बमसंचे दोन्ही आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात

By admin | Published: September 21, 2014 01:52 AM2014-09-21T01:52:32+5:302014-09-21T01:52:32+5:30

भारिप-बमसंचे अकोला जिल्ह्यातील तीन उमेदवार जाहीर.

Both the Bharamp-Bombas will again contest the elections | भारिप-बमसंचे दोन्ही आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात

भारिप-बमसंचे दोन्ही आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात

Next

अकोला : काँग्रेस आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र अस्पष्ट असतानाच भारिप-बहुजन महासंघाने तीन म तदारसंघातील उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या ४0 उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील भारिप-बमसंच्या दोन्ही आमदारांचा समावेश आहे. आकोटमध्ये पक्षाने नवीन चेहरा दिला आहे.
पितृपक्ष सुरू असल्याच्या पृष्ठभूमीवर उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला जात असतानाच भारिप-बहुजन महासंघप्रणित महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्यावतीने राज्या तील ४0 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर करण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील पाच पैकी तीन मतदारसंघांचा यादीत समावेश आहे. अकोला पूर्व म तदारसंघातून आमदार हरिदास भदे यांना तिसर्‍यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घे तला आहे. तसेच बाळापूरमधून आ. बळीराम सिरस्कार यांना दुसर्‍यांदा बाळापूर मतदारसंघातून संधी मिळाली आहे. भारिप-बमसंने आकोटमध्ये पुन्हा कुणबी समाजाला प्रतिनिधित्त्व दिले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप वानखडे यांचे नाव पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Both the Bharamp-Bombas will again contest the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.