चिखलगाव येथे दोघे कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:36+5:302021-04-07T04:19:36+5:30
मूर्तिजापुरात भाजपचे अभियान मूर्तिजापूर: भाजपच्या ४० व्या स्थापना दिनानिमित्त मूर्तिजापुरात मंगळवारपासून घर तिथे भाजपचे अभियान सुरू करण्यात आले आहे. ...
मूर्तिजापुरात भाजपचे अभियान
मूर्तिजापूर: भाजपच्या ४० व्या स्थापना दिनानिमित्त मूर्तिजापुरात मंगळवारपासून घर तिथे भाजपचे अभियान सुरू करण्यात आले आहे. यावेळी शहराध्यक्ष रितेश सबाजकर, कमलाकर गावंडे, अमित नागवान,, सचिन देशमुख, राहुल गुल्हाने, गजानन नाकट उपस्थित होते.
अल्पवयीन मुलगी बेपत्ता
बाळापूर: येथील वीटभट्टीवर कुटुंबासह काम करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलीस एका युवकाने पळवून नेल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
गुरांना पायखुरी आजाराची लागण
बोरगाव: बोरगाव वैराळे गावात गुरांना तोंडखुरी, पायखुरी आजाराची लागण झाली आहे. अंदुरा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने, पशुपालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील ७० टक्के गुरांना आजाराची लागण झाल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आलेगाव येथे वन दिन साजरा
आलेगाव: आलेगाव येथे वन सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी पांढुर्णा सरपंच लक्ष्मी शेळके, पोलीस पाटील संजय देवकते, सुरेश देवकते,वनपाल एस.डी. नालिंदे, राकेश लोखंडे, बाळासाहेब थोरात, सतीश साळवे, संदीप अलाट, गजानन जटाळे, आत्माराम बुंदे आदी उपस्थित होते.
प्रसाद म्हसाळ याची नवोदयसाठी निवड
हिवरखेड: येथील सेंट पॉल ॲकॅडमीचा आठवीचा विद्यार्थी प्रसाद रवींद्र म्हसाळ याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. त्याच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. नवनीत लखोटिया, सचिव प्रमोद चांडक, लुणकरण डागा, प्राचार्य चंद्रकांत तिवारी यांनी कौतुक केले.
हिवरखेड येथे माकडांचा हैदोस
हिवरखेड: येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात एका माकडाने धुमाकूळ घातला असून, सोमवारी केंद्रातील आरोग्यसेविकेवर हल्ला केला होता. वन विभागाने मंगळवारी माकडाला पकडण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अपयश आले. माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.