दिवसभरात दोघांचा मृत्यू; ९३ नवे पॉझिटिव्ह, १०० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 07:12 PM2020-09-12T19:12:47+5:302020-09-12T19:12:54+5:30

१२ सप्टेंबर रोजी आणखी दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७७ वर गेला.

Both died during the day; 93 new positive, 100 corona free | दिवसभरात दोघांचा मृत्यू; ९३ नवे पॉझिटिव्ह, १०० कोरोनामुक्त

दिवसभरात दोघांचा मृत्यू; ९३ नवे पॉझिटिव्ह, १०० कोरोनामुक्त

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, १२ सप्टेंबर रोजी आणखी दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७७ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८६, नागपूरच्या खासगी प्रयोगशाळेच्या अहवालांमध्ये सात, असे एकून ९३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३८२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३५९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८६ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २७३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खोलेश्वर येथील चार, तापडीया नगर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, निमवाडी, रामनगर, रणपिसे नगर, बाळापूर नाका, महान व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, शास्त्री नगर, खेतान नगर, जितापूर ता. अकोट, गीतानगर, जेतवन नगर, मलकापूर, खेडकर नगर, बलोदे लेआऊट, लहान उमरी, अकोट, करोडी ता. अकोट, गोरक्षण रोड, राऊतवाडी, डोंगरगाव, संतोषनगर, खैर मोहम्मद प्लॉट, खडकी, रेणुकानगर, शास्त्री नगर, गजानन पेठ, डाबकी रोड, पारस, कांचनपूर, वाशिंबा, बार्शिटाकळी, वाडेगाव, उमरी व शिर्ला अंधारे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये बोर्टा ता. मुर्तिजापूर येथील सात, अकोट येथील चार, चोहाट्टा बाजार, दनोरी ता.अकोट, तोष्णीवाल लेआऊट व केशवनगर येथील प्रत्येकी दोन, सुभाष चौक, बाशीर्टाकळी, पळसोद ता.अकोट, नायगाव, डाबकी रोड, आळशी प्लॉट, माळीपुरा, सिंधी कॅम्प, मधूभारती अपार्टमेंट, जूना कापड मार्केट, गजानन नगर डाबकी रोड, भारती प्लॉट जूने शहर, तारफैल, मलकापूर, मनोरथ कॉलनी, तुकाराम चौक व बापूनगर येथील प्रत्येकी रुग्णाचा समावेश आहे.


शास्त्री नगर, जठारपेठ येथील पुरुषाचा मृत्यू
शनिवारी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी एक रुग्ण जिल्हा परिषद कॉलनी, शास्त्री नगर, अकोला येथील ६० वर्षीय पुरुष असून, त्यांना ११ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. जठारपेठ येथील ४७ वर्षीय पुरुषाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.


१०० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, कोविड केअर सेंटर अकोला येथून १३, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर, अकोट येथून ११, कोविड केअर सेंटर बाशीर्टाकळी येथून तीन, तर कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून २५ अशा एकूण १०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

१०८८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३८२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४११७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १०८८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

Web Title: Both died during the day; 93 new positive, 100 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.