माजी सरपंचासह दोघांना तीन महिने कारावास
By admin | Published: May 7, 2017 02:40 AM2017-05-07T02:40:51+5:302017-05-07T02:40:51+5:30
शिवीगाळ करून जीवे मारण्याची दिली होती धमकी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार्या शिवणीच्या माजी सरपंचासह त्याच्या साथीदारास प्रत्येकी तीन महिन्यांच्या कारावास.
अकोला: एमआयडीसीमधील व्यापार्यास पैशांसाठी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार्या शिवणीच्या माजी सरपंचासह त्याच्या साथीदारास १२ वे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एस. ए. घुगे यांनी प्रत्येकी तीन महिन्यांच्या कारावास व प्रत्येकी ५00 रुपयांच्या दंडाची शिक्षा शनिवारी सुनावली.
२0११ मध्ये व्यापारी बिपीन हरिचंद्र धूत (५0) यांच्या कक्षात शिवणीचा माजी सरपंच प्रवीण पातोडे व भागवत पट्टेबहाद्दूर हे आतमध्ये गेले. या दोघांनाही त्यांना पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि कलम ४४८, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. बारावे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एम. घुगे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. प्रवीण पातोडे व भागवत पट्टेबहाद्दूर यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याने त्यांना प्रत्येक तीन महिन्यांचा कारावास व प्रत्येकी पाचशे रुपये दंड, न भरल्यास पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी विधिज्ञ डी.पी. वानखडे यांनी बाजू मांडली.