भरधाव ट्रकची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 08:08 PM2017-09-15T20:08:39+5:302017-09-15T20:09:14+5:30
मूर्तिजापूर /कुरुम/ माना: माना येथून सिरसो येथे कर्तव्यावर जाणार्या शिक्षकांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणार्या ट्रकने धडक दिल्याने दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १५ सप्टेंबरला सकाळी १0.३0 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील मलकापूर फाट्याजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर /कुरुम/ माना: माना येथून सिरसो येथे कर्तव्यावर जाणार्या शिक्षकांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणार्या ट्रकने धडक दिल्याने दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १५ सप्टेंबरला सकाळी १0.३0 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील मलकापूर फाट्याजवळ घडली.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळा सिरसो येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ऐसानोद्दीन जशीमोद्दीन ( ४५) रा. माना, मोहसिन अहमद मोबिन अहमद (३८) रा. अंबाडा जि. अमरावती ह.मु. माना हे दोघे एमएच ३७ एच ५४१५ क्रमांकाच्या दुचाकीने माना येथून सिरसो येथे कर्तव्यावर जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील मलकापूर फाट्याजवळ मूर्तिजापूरकडून अमरावतीकडे जाणार्या डब्लू बी २९ बी 0५४४ क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाने त्याचा ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला समोरून धडक दिली. यात दोन्ही शिक्षक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ट्रक चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला. सदर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उ पजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, ऐसानोद्दीन यांच्यावर माना येथे तर मोहसिन अहमद यांच्यावर अंबाडा, जि. अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ऐसानोद्दीन यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले तर मोहसिन अहमद यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा आप्त परिवार आहे.
याप्रकरणी पो.स्टे. माना येथे मो. मुस्ताक मो. ईब्राहिम रा. माना यांच्या फिर्यादीवरून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध कलम २७९, ३0४ अ भादंवि १८४ एम.व्ही. अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंदू पाटील, हेकॉ. श्याम शर्मा, पोकॉ. नंदू टिकार, विनोद तायडे, सचिन दुबे करीत आहेत.