बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : अकोल्याच्या गोपाल, अनंता, साद, हरिवंश, रोहणचा दमदार विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:30 PM2018-10-05T14:30:48+5:302018-10-05T14:31:18+5:30
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे ८८ वी वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशीच्या लढतींमध्ये अकोल्याच्या बॉक्सरांनी दमदार खेळप्रदर्शन करीत प्रतिस्पर्धींना धुळ चारली. अकोला क्रीडा प्रबोधिनीचे बॉक्सर गोपाल होगे,अनंता चोपडे, साद सय्यद, हरिवंश टावरी तसेच अकोला शहराचा बॉक्सर रोहण पटेकर यांनी आपआपल्या गटात विजय मिळवून स्पर्धेच्या दुसºया फेरीत प्रवेश केला. तर अकोल्याचा स्टार बॉक्सर अझहर अली याचे आव्हान संपुष्टात आले. अमिन मोहम्मद, श्यामल टोपलेही फारशी कामगिरी करू शकले नाहीत.
४९ किलो वजन गटात क्रीडापीठाचा गोपाल होगे यांचा सामना सांगलीच्या तुषार पाटीलसोबत झाला. गोपालने गुणांच्या आधारावर लढत जिंकली. ५२ किलो वजनगटात क्रीडापीठाचा अनंता चोपडे याची लढत मुंबई उपनगरचा बीरू बिंड याच्यासोबत झाली. अनंताने अधिक गुणांची कमाई करीत बीरू चा पराभव केला. ५६ किलो वजनगटात क्रीडापीठाचा साद सय्यदने पिंपरी चिंचवडच्या सी.वनलालमहरू याला धुळ चारली. याच वजनगटात अकोला शहराचा स्टार बॉक्सर अझहर अली याला मुंबई शहराचा फय्याज खान याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासोबतच अझहरचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ६० किलो वजनगटात अकोला शहराचा श्यामल टोपलेला नागपूरच्या रितिक मेश्रामने पराभूत केले. यानंतर झालेल्या लढतीमध्ये क्रीडापीठाचा हरिवंश टावरी याने नाशिक शहराच्या प्रसाद शिवादे याला लोळविले. ६४ किलो वजनगटात अकोला शहराचा बॉक्सर रोहण पटेकर याने मुंबईच्या बिनोद पुन याला पराभूत केले. रोहणने कट-टू -कट खेळत लढतीच्या पहिल्याच फेरीत बिनोदवर जोरदार ठोसे मारले. बिनोद थकल्यामुळे पंचांनी लढत थांबविली.
४९ किलो वजनगटात नागपूरचा लुमान शाहू, सोलापूरचा संतोष सागर, पुणेचा रोहण जगदाळे, जळगावचा सिद्धांत धिवरे, औरंगाबादचा उस्मान श्ोख, मुंबईचा आदिल सिंह, नंदूरबारचा योगेश माळी, ५२ किलो वजनगटात औरंगाबादचा विजय शेळके, वर्धाचा शुभम जुगनाके, लातूरचा प्रशांत खंडेलवाल, पुण्याचा गौरव गोसावी, पिंपरी चिंचवडचा अमरनाथ यादव, परभणीचा शहिद कुरेशी, पुण्याचा आशुतोष खोमणे, ५६ किलो वजनगटात जळगावचा अभिषेक भालेराव, नागपूरचा वीरेश बागडे, मुंबई उपनगरचा प्रिन्स श्रीवास्तव, पुण्याचा ऋषिकेश गौड, साताराचा आशुतोष भारती, औरंगाबादचा कैलास गुनसिंगे यांनी विजय मिळविला. उर्वरित लढती उशिरा रात्रीपर्यंत सुरू होत्या.