बैलांना आंघोळ घालताना मुलगा धरणात बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 02:32 PM2018-09-09T14:32:12+5:302018-09-09T17:03:57+5:30
अकोला : पोळ्याच्या सणाला बैलांना आंघोळ घालण्यासाठी घेऊन गेलेला मुलगा ईसापूर धरणात बुडाल्याच्यी घटना बार्शाीटाकळी तालुक्यातील चिचखेड येथे रविवारी सकाळी घडली.
अकोला : पोळ्याच्या सणाला बैलांना आंघोळ घालण्यासाठी घेऊन गेलेला मुलगा ईसापूर धरणात बुडाल्याच्यी घटना बार्शाीटाकळी तालुक्यातील चिचखेड येथे रविवारी सकाळी घडली.
गौरव संतोष येकणार (१२) असे या मुलाचे नाव आहे. पोळ्या निमित्त बैलांना आंघोळ घालून स्वच्छ करण्यासाठी तो सकाळीच गावाजवळच्या इसापूर धरणात गेला होता. बैलांना धूत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती समजातच ग्रामस्थांनी धरणाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकास पाचारण केले. पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी तातडीने आपल्या पथकातील युवकांना घटनास्थळी पाठवून ‘सर्च आॅपरेश’ सुरु केले.विकी साटोटे, उमेश बील्लेवार, सतीश मुंडाले, ऋत्विक सदाफळे, गोविंदा ढोके, अजय सुरडकर, मंगेश अंधारे, अक्षय चांभारे यांची चमू धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह काढण्याचा प्रयत्न करीत आहे. हे धरण जंगलात असुन, पाण्याची खोली अंदाजे २० ते २५ फुट आहे. धरणाचा परिसरत मोठा असल्याने, शोध मोहीमेत अडथळा निर्माण होत असल्याचे दीपक सदाफळे यांनी सांगितले. घटनास्थळी बाशीर्टाकळीचे तहसीलदार रवी काळे यांनीही भेट दिली.