हरविलेला मुलगा २४ तासांत पालकांच्या सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:14 AM2017-11-11T01:14:50+5:302017-11-11T01:15:10+5:30

खरब नवले येथील दिव्यांग नंदकिशोर खंडारे  यांचा १४ वर्षीय मुलगा आदित्य हा शेगाव येथे शिक्षण घेत आहे. ८  नोव्हेंबर रोजी तो शेगाव येथे जाण्यास नरखेड-भुसावळ पॅसेंजर  रेल्वेगाडीने निघाला; मात्र तो शाळेत पोहोचला नाही. याविषयी रेल्वे  पोलिसांना माहिती देताच त्यांनी २४ तासांत या मुलाचा शोध घेऊन त्याला  पालकांच्या सुपूर्द केले. 

The boy who is beaten is handed over to the guardian within 24 hours | हरविलेला मुलगा २४ तासांत पालकांच्या सुपूर्द

हरविलेला मुलगा २४ तासांत पालकांच्या सुपूर्द

Next
ठळक मुद्देखरब नवले येथील दिव्यांग नंदकिशोर खंडारे  यांचा १४ वर्षीय मुलगा आदित्य

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : तालुक्यातील खरब नवले येथील दिव्यांग नंदकिशोर खंडारे  यांचा १४ वर्षीय मुलगा आदित्य हा शेगाव येथे शिक्षण घेत आहे. ८  नोव्हेंबर रोजी तो शेगाव येथे जाण्यास नरखेड-भुसावळ पॅसेंजर  रेल्वेगाडीने निघाला; मात्र तो शाळेत पोहोचला नाही. याविषयी रेल्वे  पोलिसांना माहिती देताच त्यांनी २४ तासांत या मुलाचा शोध घेऊन त्याला  पालकांच्या सुपूर्द केले. 
 ८ नोव्हेंबर रोजी आदित्य याला त्याच्या आईने पॅसेंजर गाडीत बसवून  रवाना केले होते. त्यानंतर त्याच्या वडिलांशी अकोल्यापर्यंत फोनवर सं पर्कात होता; परंतु पुढे गेल्यावर त्याचा फोन बंद झाला व तो शेगाव येथे  पोहोचलाच नाही. त्याच्या वडिलांनी शाळेत व इतर ठिकाणी शोध घेतला;  मात्र रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. दुसर्‍या दिवशी ९ नोव्हेंबर रोजी  पोलीस पाटील सोनटक्के यांच्या मदतीने त्याच्या वडिलांनी रेल्वे पोलीस  चौकी गाठून एएसआय भीमराव गवई यांना हकिकत कथन केली. लगेच  त्याची माहिती सोशल मीडिया व्हॉट्स अँपवरून फोटोसह ग्रुपवर टाकून  शोधकाम सुरू केले. तब्बल २४ तासांनंतर एएसआय गवई, पोकाँ. संदीप  भांदुर्गे, पो. हवालदार शेख कलीम यांच्या प्रयत्नाने तो भुसावळ पोलिसांना  रेल्वे स्टेशनवर सुखरूप सापडला. 
रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांनी आदित्य त्याच्या आई-वडिलांच्या संपर्कात  आला. या कामात जीआरपी अकोलाचे ठाणेदार सॅम्युवेल वानखडे यांचे  मोलाचे मार्गदर्शन व मदत मिळाली. आदित्यच्या आई-वडिलांनी रेल्वे  पोलिसांचे आभार मानले. 

Web Title: The boy who is beaten is handed over to the guardian within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा