साहित्य संमेलनावर विठ्ठल वाघ यांचाही बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:28 PM2019-01-08T14:28:08+5:302019-01-08T14:28:53+5:30
अकोला: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रणच रद्द करण्याचा निर्णयाचा सर्वत्र निषेध होत आहे. प्रख्यात वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आ
अकोला: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रणच रद्द करण्याचा निर्णयाचा सर्वत्र निषेध होत आहे. प्रख्यात वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आहे. सोबतच स्त्रीत्वाच्या अपमानाच्या मुद्द्यावर भूमिका घेत संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनीही संमेलनाला जाऊ नये, असे आवाहनही डॉ. वाघ यांनी केले आहे.
९२ वे मराठी साहित्य संमेलन ११, १२ व १३ जानेवारीला होत आहे. या संमेलनावर उठलेली वादळे शमताना दिसत नाही. इंग्रजी भाषेतून लिखाण करणाऱ्या लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावल्यास संमेलन उधळून लावू, असा इशारा मनसेने दिला होता. त्यावर तडकाफडकी नयनतारा सहगल यांना ई-मेलद्वारे ‘उद्घाटक म्हणून आपले निमंत्रण रद्द समजावे’, असे पत्र पाठवण्यात आले. या प्रकाराचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच अनेकांनी संमेलनावरच बहिष्कार टाकला आहे. त्यात आता वºहाडातील प्रसिद्ध कवी डॉ. वाघ यांनीही निषेध करत संमेलनावर बहिष्कार असल्याचे जाहीर केले आहे. सहगल यांचा अपमान म्हणजे स्त्रीत्वाचा अपमान झाल्याच्या मुद्यावर संमेलनाच्या अध्यक्ष ढेरे यांनीही भूमिका घेऊन जाणे टाळावे, असेही डॉ. वाघ म्हणाले.