एक शाखा; एकशे एक वृक्षाची लागवड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 03:48 PM2019-07-28T15:48:08+5:302019-07-28T15:48:14+5:30

शिवसेना शहर संघटिका वर्षा अरविंद पिसोडे यांनी एक शाखा एकशे एक वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.

 A branch; One hundred and one trees plantation | एक शाखा; एकशे एक वृक्षाची लागवड  

एक शाखा; एकशे एक वृक्षाची लागवड  

Next

अकोला: निवडणुका आल्या की राजकीय पक्ष नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऊत येतो. सभा, दौरे, मिरवणुका आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेचे आम्हीच खरे कैवारी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करतात; मात्र प्रत्यक्षात कार्य कमी आणि प्रचार जास्त असतो; मात्र शिवसेनेत ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा आदर्श अकोल्यातील शिवसेना महिला शाखेच्या पदाधिकारी करीत आहे. सामाजिक भान गमाविणाऱ्यांना आरसा दाखविण्याचे कार्य अकोल्यातील शिवसेना शहर संघटिका वर्षा अरविंद पिसोडे करीत आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान आणि पाणी टंचाईच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी वृक्ष लागवडशिवाय पर्याय नाही. ही बाब प्रत्याक्षिकातून पटवून सांगण्यासाठी शहर संघटिका पिसोडे यांनी एक शाखा एकशे एक वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. केवळ शाखा स्थापन करणे हा उद्देश नाही तर प्रत्येक महिला शाखेने महिलांची संख्या वाढविणे आणि त्या माध्यमातून वृक्षारोपण करणे हा होय. असे प्रत्येक शाखा उद्घाटनाच्या वेळी सांगितले जात आहे.
जिल्ह्यात शिवसेनेच्या शाखा स्थापनेसोबतच वृक्ष लागवडीची ही चळवळ सुरू झाली असून, ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. बोरगाव खुर्द येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. भगवत सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण करून शिवसेना महिला आघाडीने सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. संपर्क संघटिका वैशाली घोरपडे यांच्या मार्गदर्शनात शहर संघटिका वर्षा पिसोडे जिल्हा संघटिका, देवश्री ठाकरे, शुभांगी किनके यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाखा संघटिका रूपाली वानखेडे, उपशाखा संघटिका रेखा ठाकरे यांच्यासह बहुसंख्य महिला व युवतींची उपस्थिती होती. बोरगाव सोबतच वाळकी येथे शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापनेसोबतच वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विलास खंडारे, चेतन सोनवणे, पवन वानखडे, गजानन सोनवणे, मोहन मनावर यांच्यासह शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
 

 

Web Title:  A branch; One hundred and one trees plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.