विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:23 AM2021-09-14T04:23:40+5:302021-09-14T04:23:40+5:30

नुकसानाच्या प्रस्तावासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत पूर्वसूचना मोबाइल ॲपद्वारे ...

Break the arbitrariness of insurance companies; Six options for loss proposition | विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

Next

नुकसानाच्या प्रस्तावासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत पूर्वसूचना मोबाइल ॲपद्वारे नोंदणी करून संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाइल नसल्यामुळे, तसेच नेटवर्क, सर्व्हर डाऊन अशा विविध समस्यांमुळे शेतकरी नुकसानाची पूर्वसूचना देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींना आता ब्रेक लागणार आहे.

--------------------------

आधी हे होते दोन पर्याय

१ ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. ते शेतकरी संबंधित विमा कंपन्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करून नुकसानाची सूचना देत होते. मात्र, भ्रमणध्वनीवर अनेक शेतकऱ्यांचा संपर्कच होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंद होत नव्हती.

२) मोबाइल ॲप्सद्वारे नुकसानाबाबत माहिती सादर करून, तसेच त्या ॲप्समध्ये नुकसानीचे फोटो अपलोड करून माहिती सादर करण्यात येत होती.

---------------------

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ८ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दि. ६, ७ व ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने १९५ गावांमधील ८६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. तसेच जुलै महिन्यातही जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले होते.

-----------------------------

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे राहू नये, यासाठी सहा पर्याय सुचविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जो पर्याय सोयीस्कर ठरेल. त्यानुसार नुकसानाची माहिती नोंदवावी.

-कांताप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

---------------------

हे आहेत पर्याय

क्रॉप इन्शुरन्स ॲप

विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक

विमा कंपनीचा ई-मेल

विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय

कृषी विभागाचे मंडळ कृषी कार्यालय

ज्या बँकेत विमा जमा केला, ती बँक शाखा

Web Title: Break the arbitrariness of insurance companies; Six options for loss proposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.