हातावर पोट असणाऱ्यांच्या उत्पन्नाला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:16 AM2021-04-19T04:16:40+5:302021-04-19T04:16:40+5:30

--कोट-- संचारबंदी सुरू झाल्यापासून पाणीपुरीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दिवसाला २००-२५० रुपये नफा होत होता. आता तोही बंद झाला ...

Break the income of those who have a stomach on their hands! | हातावर पोट असणाऱ्यांच्या उत्पन्नाला ब्रेक!

हातावर पोट असणाऱ्यांच्या उत्पन्नाला ब्रेक!

Next

--कोट--

संचारबंदी सुरू झाल्यापासून पाणीपुरीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दिवसाला २००-२५० रुपये नफा होत होता. आता तोही बंद झाला आहे. दररोजचा खर्च सुरुच असून एक-एक दिवस काढणे कठिण झाले आहे.

योगेश गवळी, पाणीपुरी विक्रेता

--कोट--

पान टपरीच्या भरवशावर घर चालते. संचारबंदीमुळे तेही बंद ठेवावे लागत आहे. थोडेफार उत्पन्न होत होते; आता तेही बंद आहे. दैनंदिन खर्च भागविताना अडचणी येत आहे.

योगेश भरणे, पान टपरी चालक

--कोट--

दरवर्षी उन्हाळ्यात कैरी पाणी विकण्याचा व्यवसाय करतो; मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या उन्हाळ्यात व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. आधीच रोजगार नाही, त्यात काही व्यवसाय करायचे म्हटले तर या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

राजेश खांडेकर, कैरी पाणी विक्रेता

--कोट--

माठ विक्रीच्या व्यवसायात केवळ उन्हाळ्यातच कमाई होते. मागील वर्षी उन्हाळ्यापासून या व्यवसायावर अवकळा आली आहे. जुनाच माल विकावा लागत आहे. खर्च भागविताना चांगलीच दमछाक होत आहे.

मदन घोटाळे, माठ विक्रेता

--कोट--

शहरातील सर्व मंदिर बंद आहे. यासोबत लग्न सोहळे, कार्यक्रमही बंद असल्याने फुलाला मागणी नाही. आता कडक संचारबंदीमुळे व्यवसाय आणखी संकटात सापडला आहे. ग्राहक नसल्याने फुलांचे दरही घसरले असून अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने विक्री बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

मुकेश विटकर, फुल विक्रेता

--कोट--

छोटा चप्पल विक्रीचा व्यवसाय चालवून उदरनिर्वाह करतो. संचारबंदीमुळे तोही बंद आहे. घरची परिस्थितीही जेमतेम असल्याने रोज पैसे कमवून न आणल्यास घर कसे चालणार?, खर्च कसा भागवावा? असा प्रश्न पडला आहे.

रहीम खान इम्रान खान, चप्पल विक्रेता

--बॉक्स--

जिल्ह्यात शासकीय मदत यांना मिळणार!

ऑटोरिक्षा चालक

१६,१०२

मोलकरणी

३,५००

--बॉक्स--

कर्जाचे हप्ते थकले!

अनेकांनी घर, मोटारसायकलसोबत घरगुती सामानही कर्जाने घेतले आहे. मागील लॉकडाऊनमध्ये तीन महिने सरकारने कर्ज वसुली थांबविण्याचे आदेश दिले होते; मात्र या संचारबंदीत कर्ज वसुली सुरुच आहे. बहुतांश नागरिकांचे पैसे नसल्याने हप्ते थकले आहे.

Web Title: Break the income of those who have a stomach on their hands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.