वीटभट्टय़ांतून होणार्‍या प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:49 AM2017-10-12T01:49:08+5:302017-10-12T01:49:34+5:30

अकोला : जिल्हय़ातील अनेक महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना त्यापैकी केवळ ४६ ची कागदोपत्री नोंद आहे. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे. 

Break the pollution of briquettes | वीटभट्टय़ांतून होणार्‍या प्रदूषणाचा विळखा

वीटभट्टय़ांतून होणार्‍या प्रदूषणाचा विळखा

Next
ठळक मुद्देमहामार्गालगत वीटभट्टय़ा सुरूच प्रदूषण नियंत्रण कायदा कागदावरच!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील अनेक महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना त्यापैकी केवळ ४६ ची कागदोपत्री नोंद आहे. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे. 
कायद्याप्रमाणे राष्ट्रीय-राज्य महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर वीटभट्टीची जागा निश्‍चित झाली आहे, तर पारंपरिक वीटभट्टय़ांना मानवी वस्तीपासून कमीत कमी दोनशे मीटरच्या पुढे निर्मिती करता येईल, तसे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.  पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळीच अंमलबजावणीचे निर्देशही देण्यात आले; मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता बिघडविणार्‍या वीटभट्टय़ांसंदर्भात कोणतीही कारवाई अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली नाही. त्यासाठी महसूल विभागाकडून माहिती मागविण्यात आली. माहिती मागवण्याच्या नादात अद्यापही वीटभट्टय़ांवर प्रदूषणासाठी कारवाईच झाली नसल्याची माहिती आहे. 

महामार्गालगत वीटभट्टय़ांची गर्दी 
कायद्यानुसार वीटभट्टय़ांना आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घ्यावी लागणार आहे; मात्र सद्यस्थितीत अकोला जिल्हय़ातील अनेक गावे, महामार्गालगतच वीटभट्टय़ांची प्रचंड गर्दी आहे. त्यामध्ये बाळापूर, चोहोट्टा, हाता, अंदुरा, भौरद, मनात्री या ठिकाणी महामार्गालगतच वीटभट्टय़ा आहेत. त्यापैकी काहीच भट्टय़ांची माहिती महसूल विभागाकडे आहे. उर्वरित भट्टय़ा अनधिकृत असल्याचेच चित्र आहे. त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईबाबत कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही, हे विशेष.

Web Title: Break the pollution of briquettes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.