रोग्य कर्मचारी वर्गाचे निवासस्थान इमारतीला भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:20 AM2021-04-28T04:20:03+5:302021-04-28T04:20:03+5:30
आगर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या निवासी इमारतीला मोठमोठ्या ...
आगर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या निवासी इमारतीला मोठमोठ्या भेगा पडल्याने कर्मचारी वर्गासह वैद्यकीय अधिकारी यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येथे गेल्या तीस वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित असून दहा वर्षांपासून येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे, तर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी घरे बांधण्यात आली आहेत; पण सदर निवासस्थान शिकस्त झाले असून भिंतीला मोठमोठे तडे गेले आहेत. अशातच वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस पडल्यास यातील काही निवासस्थाने कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून याबाबत जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून आरोग्य कर्मचारी वर्गासह वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
आरोग्य केंद्र परिसरात कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी बांधण्यात आलेले निवासस्थान शिकस्त झाले असून, याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी निवासस्थानाची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
डाॅ. अजय नाथक, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, आगर