घरात घुसून लोखंडी कपाट फोडत ऐवज लंपास
By सचिन राऊत | Published: January 19, 2024 06:48 PM2024-01-19T18:48:03+5:302024-01-19T18:50:09+5:30
तापडिया नगरात घरी एकटीच राहत असलेली मजूर महिला शिवकन्या मनोहर बावस्कर (४५) ही मजुरीचे आलेले पैसे जमा करून घरातील लोखंडी कपाटात ठेवत असते.
अकोला : मजूर महिला कामाला गेली असता घरातील कपाटातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना शहरातील तापडिया नगरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तापडिया नगरात घरी एकटीच राहत असलेली मजूर महिला शिवकन्या मनोहर बावस्कर (४५) ही मजुरीचे आलेले पैसे जमा करून घरातील लोखंडी कपाटात ठेवत असते. दरम्यान, १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान ती घाईघाईत घराचा दरवाजा लोटून कुलूप न लावता स्वयंपाक करायला कामाच्या ठिकाणी गेली. यावेळी परिसरातील बरेच लोक कामाला गेलेले होते.
काम आटोपून ती रात्री ८ वाजता घरी आली असता ओढलेला दरवाजा बंद होता. दरवाजा लोटून घरात जाऊन पाहिले असता घरातील दिवाणवर कपाटातील पांढरे पाकीट व कपाटाची चावी पडलेली दिसली. त्यामुळे तिने कपाटात ठेवलेले तीन पाकिटात ४० हजार रुपये पाहिले असता चोरट्यांनी पळविण्याचे समोर आले. त्याच दिवशी घराशेजारील व्यक्ती हा एकटाच घरी होता, असे शेजारील लोकांनी सांगितल्याने संशयावरून तेल्हारा पोलिसांनी १८ जानेवारी रोजी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.