अकोला जिल्ह्यात रुग्णवाढीला ब्रेक : केवळ सहा पॉझिटिव्ह; १२ रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 06:47 PM2020-11-08T18:47:38+5:302020-11-08T18:48:17+5:30
Akola CoronaVirus News एकूण सहा नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,५४७ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा सैल होत असून, नव्याने पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांची संख्या गत दोन महिन्यांमध्ये प्रथमच एकेरी आकड्यात आली आहे. रविवार ८ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्य पाच, तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये एक असे एकूण सहा नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,५४७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये न्यू बैदपुरा रामदास पेठ, आदलापुर ता. अकोट, कौलखेड, अमानखाँ प्लॉट व बार्शिटाकळी येथील प्रत्येकी एक अशा पाच जणांचा समावेश आहे.
रॅपिड चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह
रविवारी झालेल्या एकूण २३ रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये केवळ एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत २२४४४ चाचण्यांमध्ये १५४१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
१२ जणांना डिस्चार्ज
रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून दोन अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
२१४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,५४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८०६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २१४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.