जैवविविधता राखण्यासाठी गोसंवर्धन काळाची गरज – सुरेश गोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:17 AM2021-05-24T04:17:59+5:302021-05-24T04:17:59+5:30
चर्चासत्राचे उद्घाटन विद्यापीठाचे मा संचालक संशोधन, प्रा. डॉ. नितीन कुरकुरे यांचे हस्ते , संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता तथा कार्यक्रम संयोजक ...
चर्चासत्राचे उद्घाटन विद्यापीठाचे मा संचालक संशोधन, प्रा. डॉ. नितीन कुरकुरे यांचे हस्ते , संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता तथा कार्यक्रम संयोजक प्रा. डॉ. अनिल भिकाने, यांचे अध्यक्षतेखाली डॉ धनजंय परकाळे,अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन,महाराष्ट्र राज्य, पूणे,प्रा. डॉ. ए.पी.सोमकुवर, मा. अधिष्ठाता विद्याशाखा, प्रा. डॉ.व्ही. डी. आहेर, मा. संचालक विस्तार शिक्षण, नागपूर,डॉ नितीन मार्कडेंय, सहयोगी अधिष्ठाता, परभणी व श्री पी करुणानिथी, वरिष्ठ उपाध्यक्ष, ॲलेम्बीक फार्मा यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला. प्रा. डॉ. शैलेन्द्र कुरळकर, विद्यापीठ विभाग प्रमुख, पशुआनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग यांनी सदर चर्चासत्राचे प्रास्ताविक करताना आयोजनाची भूमिका विशद केली.
व्याख्यानानंतर आयोजित खुल्या चर्चासत्रात उपस्थितांनी देशी गोवंश संवर्धन अनुषंगाने उत्तम वळूची निवड, एक गाव एक वान; गो-पैदासकार संघटना उभारणी, संवर्धंनासाठी लोकसहभाग आदि विषयासह उच्च प्रतीच्या पशुधनासाठी भ्रूण प्रत्यारोपणसारख्या प्रगत तंत्राची गरज अशा अनेक विषयांवर देवणी गोवंश संघाचे अध्यक्ष डॉ भास्कर बोरगावकर, सजल कुलकर्णी, अमित गद्रे, डॉ महादेव सवाने, डॉ श्याम झंवर, डॉ सतीश राजू, डॉ. किशोर बिडवे आदीनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर तज्ञानी उत्तरे देऊन सांगोपांग चर्चा केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. भिकाने यांनी देशी गोवंश संवर्धंनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याने, देशी गायींचे पैदासकार तथा गोपालकांनी ब्रीड सोसायटी म्हणजेच पैदासकार संघटना उभारणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
सदरिल कार्यक्रमास महाराष्ट्रभरातून ३०० हून अधिक संशोधक, प्राध्यापक, अधिकारी, पशुवैद्यकीय, गोपालक, पैदासकार, गोशाळा चालक आदी उपस्थित होते. संचालन कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रवीण बनकर यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. हनुमंत कानडखेडकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीते साठी डॉ. संतोष शिदे सहायक व्यवस्थापक, डॉ नरेश कुलकर्णी अलेम्बिक फार्मा यानी अथक परिश्रम घेतले