१० हजार रुपयांची लाच मागितली; पीएसआयसह तिघे एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:29 PM2018-11-28T12:29:18+5:302018-11-28T12:30:14+5:30
अकोला - सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक शैलेष म्हस्के याच्यासह त्याचा रायटर राजेश शेंडे व गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध १० हजार रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. या
अकोला - सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक शैलेष म्हस्के याच्यासह त्याचा रायटर राजेश शेंडे व गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध १० हजार रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. या तीनही लाचखोरांनी एका इसमाविरुद्ध मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागीतली होती.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी एका इसमास त्यांच्याकडे चोरीचा मोबाइल असल्याच्या कारणावरून अकोल्यात बोलावण्यात आले. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला शैलेश सुरेश म्हस्के आणि त्याचा रायटर राजेश शेंडे व तिसरा पोलीस कर्मचारी या तिघांनी त्यांना चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली; मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी २२ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, शैलेष म्हस्के, राजेश शेंडे व गुन्हे शोध पथकात काम करीत असलेला तिसरा कर्मचारी यांनी लाच मागीतल्याचे सिद्ध झाले. म्हस्केसह दोन्ही पोलीस कर्मचाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचल्याचे लक्षात येताच या तीनही जणांनी सदर इसमास मारहाण करीत, त्याच्याकडील रेकॉर्डर तोडले तसेच जबरदस्तीने बंदीस्त केले. या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी २२ नोव्हेंबर रोजी केल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी शैलेष सुरेश म्हस्के, राजेश शेेंडे व गुन्हे शोध पथकात काम करीत असलेला तसेच बºयाच वर्षांपासून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातच कार्यरत असलेल्या तिसºया पोलीस कर्मचाºयाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक सुधारणा कायद्याच्या कलम ७,७(अ) नुसार तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२ (जबरी चोरी), २०१ (पुरावे नष्ट करणे), ३४२ (जबरदस्तीने बंदीस्त करणे) ३४, तसेच ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हॉइस रेकॉर्डरचे मेमरी कार्ड बदलले
एसीबीच्या अधिकाºयांनी सापळा रचल्याचे लक्षात येताच पीएसआय शैलेष म्हस्के, राजेश शेंडे व गुन्हे शोध पथकातील कर्मचाºयाने संगनमताने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या व्हाइस रेकॉर्डरची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यामधील मेमरी कार्ड बदलण्यात आले. तसेच तक्रारकर्त्यास शिवीगाळ करीत जबरदस्तीने बंदीस्त करून त्यांच्या अंगावरील कपडे काढण्यात आले. यावरून तक्रारकर्त्याचा प्रचंड छळ लाचखोर पोलिसांनी केला.