अकाेला पंचायत समितीचा लाचखाेर लिपिक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 07:56 PM2021-09-28T19:56:03+5:302021-09-28T20:00:19+5:30
अकाेला : अकाेला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या लिपिकास दाेन हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ अटक ...
अकाेला : अकाेला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या लिपिकास दाेन हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ अटक करण्यात आली़ अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून लाचेची रक्कम जप्त करून या आराेपीविरुद्ध सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तक्रारदार हे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांचे थकीत वेतन काढण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्यासाठी अकाेला पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेला लिपिक संताेष मनसाराम ताले याने दाेन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़ मात्र, तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली़ यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता लिपिकाने लाच मागितल्याचे समाेर आले़ त्यानंतर लाच घेण्याचा दिवस मंगळवार ठरताच तक्रारदार हे लाच देण्याची रक्कम पंचायत समितीत घेऊन आले असता लिपिकाने लाचेची रक्कम स्वीकारताच सापळा रचून असलेल्या अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास लाच घेताना रंगेहाथ अटक केली़ त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून या आराेपीविरुद्ध सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या लाचखाेर लिपिकास बुधवारी न्यायालयासमाेर हजर करण्यात येणार आहे़ ही कारवाई पाेलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पाेलीस अधीक्षक, अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़