‘सीएस’ कार्यालयातील लाचखोर लिपिकास अटक

By admin | Published: January 23, 2016 01:48 AM2016-01-23T01:48:53+5:302016-01-23T01:48:53+5:30

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील लाचखोर लिपिकास एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक.

The bribe scribe in the 'CS' office was arrested | ‘सीएस’ कार्यालयातील लाचखोर लिपिकास अटक

‘सीएस’ कार्यालयातील लाचखोर लिपिकास अटक

Next

अकोला - जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील लाचखोर लिपिकास एक हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी रंगेहाथ अटक केली. नरहरी तारापुरे असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारीच आरोग्य खात्याच्या एका वरिष्ठ लिपिकास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने लाचखोरीप्रकरणी तीन वर्षांंची शिक्षा सुनावल्यानंतरही आरोग्य विभागातीलच दुसर्‍या लिपिकाने एक हजार रुपयांची लाच घेण्याची हिंमत केली, हे विशेष. सवरेपचार रुग्णालयामध्ये कार्यरत असलेली एक अधिपरिचारिका गत अनेक वर्षांंपासून वैद्यकीय सेवेत होती. मात्र २00८ मध्ये या अधिपरिचारिकेस कर्करोग जडल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. वैद्यकीय उपचार केल्यानंतर २0१0 मध्ये सदर अधिपरिचारिका वैद्यकीय सेवेत पुन्हा रुजू झाली. मात्र, २0११ मध्ये त्यांना पुन्हा इन्फेक्शन झाले आणि त्या आजारी पडल्या. अधिपरिचारिका आजारी असतानाचे सर्व वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयकं त्यांनी वेळोवेळी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सादर केली. औषधोपचार सुरू असतानाच २0१३ मध्ये या अधिपरिचारिकेचा मृत्यू झाला. मात्र, सदर अधिपरिचारिकेने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात वारंवार सादर केलेली २00८ ते २0१३ पर्यंंतची वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयकं या कार्यालयाकडून देण्यात आली नाही. अधिपरिचारिकेच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने प्रलंबित असलेल्या देयकांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात फेर्‍या घालणे सुरू केले. मात्र, या कार्यालयातील लिपिक नरहरी बाळकृष्ण तारापुरे (५७) याने त्यांना वारंवार लाचेची मागणी केली. लाच दिल्यावरही काम होत नसल्याने अधिपरिचारिकेच्या मुलाने या प्रकरणाची तक्रार अकोला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने शुक्रवारी सापळा रचून तारापुरे याला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

Web Title: The bribe scribe in the 'CS' office was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.