लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठी एसीबीच्या जाळय़ात
By admin | Published: August 12, 2015 11:13 PM2015-08-12T23:13:15+5:302015-08-12T23:13:15+5:30
वाशिम येथील तलाठी कार्यालयातील घटना.
वाशिम : पंधरा वर्षापूर्वी खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद करुन देण्यासाठी एक हजार लाच स्विकारणार्या लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठय़ला एसीबी पथकाने रंगेहात पकडले. ही घटना येथील तलाठी कर्यालयात बुधवारी घडली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक ए.जी. रुईकर यांच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराचे वडिलांनी पंधरा वर्षापूर्वी खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद करुन देण्यासाठी तलाठी प्रकाश किसनराव इंगळे रा. गोंदेश्वर व मंडळ अधिकारी दिनकर श्रीपत मनवर यांनी लाचेची मागणी केली. बुधवारी तक्रारदाराकडून एक हजार रुपये व मद्याची बाटली स्विकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचखोर कर्मचार्याविरूद्ध गुन्हा लिहीण्याची प्रक्रिया सुरू होती.