नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 10:47 AM2021-08-02T10:47:05+5:302021-08-02T10:47:12+5:30

Bribery Cases in Akola : कोरोनातील दीड वर्षांच्या काळातही ८५ तक्रारी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Bribery is rampant even in denominations and curfews | नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात

नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात

Next

- सचिन राऊत

अकाेला : आधी २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. त्यानंतर उद्योग व्यवसायांवर परिणाम झाला. तशीच परिस्थिती कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये झाली. मात्र तरीही नोटाबंदी आणि कोरोनाच्या संचारबंदीतही लाचखोरी जोरात असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती विभागात केलेल्या कारवायांवरून समाेर आले आहे़. गेल्या साडेपाच वर्षात अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीच्या ५४१ तक्रारी आल्या. तर कोरोनातील दीड वर्षांच्या काळातही ८५ तक्रारी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुळात, लाच देणे आणि घेणे हे दोन्हीही बेकायदा आहे. परंतु, आपले काम विनाविलंब व्हावे, यासाठी कधी कधी सामान्य नागरिक हे कायदेशीर किंवा बेकायदा कामे विनाअडथळा होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांपासून ते अगदी महसूल अधिकाऱ्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लाचेचे आमिष दाखवितात. तर काही वेळा याच अधिकाऱ्यांकडून अशा लाचेची मागणी केली जाते. लाच दिली जात नाही तोपर्यंत अडवणूक केली जाते. परंतु, नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा लाचखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

पोलीस आणि महसूल खाते आघाडीवर

२०२१ मध्ये अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३१ जुलैपर्यंत लाचेची ५९ प्रकरणे दाखल झाली. यात सर्वाधिक सात प्रकरणे महसूल विभागाच्या विरोधातील आहेत़ त्यापाठोपाठ पाेलीस विभाग पाच, महानगरपालिकेच्या चार तर जिल्हा परिषदेतील चार लाचखोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे़

 

लाच ५०० पासून पाच लाखांपर्यंत...

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या पिंजर येथील एका अभियंत्याने ५०० रुपयांची लाच मागितली हाेती़ या लाचखाेरी प्रकरणात अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या लाचखाेर अभियंत्यास अटक केली हाेती़ यावरून ५०० रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत लाच मागण्यात येत असल्याचे वास्तव आहे़

आराेग्य विभागातील आराेग्य उपसंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितली हाेती़ या प्रकरणात अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित अधिकाऱ्यास लाचेतील पहिला हप्ता घेतांना रंगेहाथ अटक केली हाेती़ तर घरझडतीमध्येही माेठ्या प्रमाणात रक्कम आढळली हाेती़

‘‘शासकीय कामांसाठी कोणी लाचेसाठी अडवणूक करीत असेल तर न डगमगता सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींविरुद्ध नागरिकांनी तक्रार करावी. तक्रार केल्यानंतर आपले काम होणार नाही, अशी एक अनाठायी भीती असते. परंतू, ते काम कायदेशीर असेल तर ते होण्यासाठी एसीबीकडूनही पाठपुरावा केला जातो. त्यामुळे कोणी लाच देणे घेणे करू नये. तक्रार आली तर एसीबीकडून शहानिशा करून कारवाई केली जाते.

- शरद मेमाने उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकाेला

 

...........................

वर्ष लाच प्रकरणे

२०१६- ११०

२०१७-८७

२०१८- ९७

२०१९- १०३

२०२०- ८५

२०२१ (३१ जुलैपर्यंत)-५९

Web Title: Bribery is rampant even in denominations and curfews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.