लाचखोर लिपिकाची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:22 AM2017-08-23T01:22:10+5:302017-08-23T01:23:24+5:30
अकोला: बक्षीराम रुडमल हायस्कूलमध्ये कार्यरत असलेल्या लिपिकास ५ हजार ५00 रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

भविष्य निर्वाह निधीची ५ लाख ५0 हजार रुपयांची रक्कम मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाला एक टक्का म्हणजेच साडेपाच हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून लाचेची मागणी करणार्या खडकीतील रहिवासी तसेच बी.आर. हायस्कूलमध्ये लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक एकनाथ शिंदे (५३) याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी अटक केली होती. त्याला सोमवारी लाचलुचपत पथकाने अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.