लाचखोर पुरवठा निरीक्षक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:19 AM2021-04-08T04:19:02+5:302021-04-08T04:19:02+5:30

पाच हजार ५०० रुपयांची लाच मागणे भोवले लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराकडे ...

Bribery supply inspector arrested | लाचखोर पुरवठा निरीक्षक अटकेत

लाचखोर पुरवठा निरीक्षक अटकेत

Next

पाच हजार ५०० रुपयांची लाच मागणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराकडे ५ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी अटक केली. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला तहसील कार्यालयातील अन्न नागरी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेला नीलेश भास्कर कळसकर (वय ३२) याने बोरगाव मंजू येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडे त्याच्या दुकानातून कोरोना काळात वाटप झालेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या अंदाजे ५५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यासाठी दहा टक्के याप्रमाणे म्हणजे ५ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र तक्रारकर्त्याला लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ एप्रिल रोजी पडताळणी केली असता, कळसकर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवार, ७ एप्रिल रोजी तक्रारदार यांना भीती वाटल्याने ते सापळा कारवाईदरम्यान हजर राहिले नाहीत; मात्र पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत नीलेश कळसकर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली. कळसकर याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक विशाल गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरुण सावंत तसेच अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम मिसूरकर, अभय बावस्कर, अरुण इंगोले, राहुल इंगळे यांनी केली.

Web Title: Bribery supply inspector arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.