वीटभट्ट्यांवरील मजूर विद्यार्थ्यांचे लवकरच सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:27 PM2020-02-22T13:27:09+5:302020-02-22T13:27:24+5:30

वीटभट्ट्यावर काम करणाºया मजूर विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण तलाठी, मंडळ अधिकारी व शिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे.

Brick kilns workers survey soon! | वीटभट्ट्यांवरील मजूर विद्यार्थ्यांचे लवकरच सर्वेक्षण!

वीटभट्ट्यांवरील मजूर विद्यार्थ्यांचे लवकरच सर्वेक्षण!

Next

अकोला : जिल्ह्यातील वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजूर विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच सुरू करण्यात येणार असून, सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर मजूर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीची उपाययोजना १ मार्चपर्यंत प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात वीटभट्ट्यांवर मजुरीचे काम करणाºया विद्यार्थ्यांची माहिती घेऊन, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी २० फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्ह्यातील वीटभट्ट्यावर काम करणाºया मजूर विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण तलाठी, मंडळ अधिकारी व शिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे. त्यामध्ये वीटभट्टीवर काम करणारे विद्यार्थी, वीटभट्टीपासून जवळच असलेली शाळा इत्यादी प्रकारची प्रकारची माहिती सर्वेक्षात घेण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर वीटभट्टीपासून जवळ असलेल्या शाळांमध्ये मजूर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे आणि वीटभट्टीपासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याची उपाययोजना जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील वीटभट्ट्यांवर मजुरीचे काम करणाºया विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचे काम लवकरच तलाठी, मंडळ अधिकारी, शिक्षकांमार्फत सुरू करण्यात येणार आहे.

 

Web Title: Brick kilns workers survey soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.