निर्गुणा नदीवरील पुलाचे कठडे गायब; अपघाताची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:51+5:302021-04-04T04:18:51+5:30
वाडेगाव : वाडेगाव-अकोला मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाने असलेल्या निर्गुणा नदीवरील असलेल्या पुलाचे कठडे गायब झाल्याने अपघाताची ...
वाडेगाव : वाडेगाव-अकोला मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाने असलेल्या निर्गुणा नदीवरील असलेल्या पुलाचे कठडे गायब झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलावर कठडे बसविण्याची मागणी होत आहे.
गत दोन वर्षांपासून वाडेगाव-अकोला मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. अकोला येथे जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गाने नेहमीच वर्दळ सुरू असते. रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर मुरूम टाकण्यात आला आहे. मुरुमामुळे या मार्गाने प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच निर्गुना नदीवर असलेल्या पुलाच्या दोन्ही कडेला मोठे खड्डे पडले असल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तरीही संबंधित प्रशासन विभागाला जाग येत नसल्याचे चित्र आहे. या पुलाला कठडे नसल्याने पूल धोकादायक बनला आहे. याकडे संबंधित विभाग किंवा वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या पुलाला कठडे, खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकाकडून होत आहे.
वाडेगाव-अकोला रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. खड्ड्यांमुळे या मार्गावर अपघाताच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती लवकर करण्यात यावी.
- रुपाली अंकुश शहाणे, ग्रा.पं. सदस्य, वाडेगाव
निर्गुणा नदीवरील पुलाचे कठडे गायब झाले असून, या पुलावरून वाहन खाली कोसळण्याची भीती आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलाला त्वरित कठडे बसवावे.
- अय्याज साहिल, ग्रामस्थ, वाडेगाव