भांडपुरा दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:17 AM2017-09-15T01:17:27+5:302017-09-15T01:17:37+5:30

जुने शहरातील भांडपुरा चौकात झालेल्या दगडफेकीत निष्पाप नागरिकांवर जखमी होण्याची वेळ आली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, गुरुवारी रात्री आमदार गोवर्धन शर्मा यांनी भांडपुरा चौकात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. भांडपुरा परिसरातील जड वाहनांवर निर्बंध घालण्यासह असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावण्याचे निर्देश आ. शर्मा यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले. 

Bridle stone | भांडपुरा दगडफेक

भांडपुरा दगडफेक

Next
ठळक मुद्देआमदारांनी घेतला आढावा!जड वाहनांवर बंदी का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जुने शहरातील भांडपुरा चौकात झालेल्या दगडफेकीत निष्पाप नागरिकांवर जखमी होण्याची वेळ आली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, गुरुवारी रात्री आमदार गोवर्धन शर्मा यांनी भांडपुरा चौकात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. भांडपुरा परिसरातील जड वाहनांवर निर्बंध घालण्यासह असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावण्याचे निर्देश आ. शर्मा यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले. 
युवकाला वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून बुधवारी भांडपुरा चौकात दोन समाजात प्रचंड दगडफेक झाली. असामाजिक तत्त्वांनी गोटमार केल्यामुळे निष्पाप नागरिक जखमी झाले. यावेळी परिसरात उभ्या असणार्‍या अनेक वाहनांची व दुकानांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मारहाणीत अनेक जण किरकोळ जखमी झाले असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील दीपक भांगे याला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले आहे. अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा गुरुवारी सायंकाळी अकोल्यात दाखल होताच, त्यांनी रात्री भांडपुरा चौकात जाऊन स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधत विचारपूस केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले. या घटनेत जखमी झालेल्या दीपक भांगे याच्या उपचारासाठी रामनवमी शोभा यात्रा समितीतर्फे २५ हजारांची रोख रक्कम देण्यात आली. यावेळी भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, डॉ. विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, नगरसेवक सतीश ढगे, अनिल गरड, तुषार भिरड, जयश्री दुबे,अमोल गोगे, नीलेश निनोरे, हेमंत शर्मा,डॉ. संजय ढोरे, उमेश गुजर, उमेश सटवाले, अनुप गोसावी, कपिल बुंदेले, सचिन बोरेकर, अशोक गुप्ता, अनिल मानधने, संदीप वाणी, मोहन गुप्ता, नवीन गुप्ता, राम ठाकूर, नितीन जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: Bridle stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.