धक्कादायक! पत्नीला आणून द्या हो... म्हणत, त्याने अंगावर डिझेल घेऊन पेटविले

By नितिन गव्हाळे | Updated: May 23, 2023 13:32 IST2023-05-23T13:31:08+5:302023-05-23T13:32:02+5:30

युवक गंभीररीत्या भाजला आहे.

Bring the wife yes... Saying, he put diesel on his body and set it on fire | धक्कादायक! पत्नीला आणून द्या हो... म्हणत, त्याने अंगावर डिझेल घेऊन पेटविले

धक्कादायक! पत्नीला आणून द्या हो... म्हणत, त्याने अंगावर डिझेल घेऊन पेटविले

अकोला : पत्नीसह दोन मुलांना एका युवकाने पळवून नेले असून, त्यांचा पोलिसांनी शाेध घेऊन आणून द्यावे, या मागणीसाठी आणि आलेल्या नैराश्यातून एका युवकाने सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात येऊन सोमवार, २२ मे रोजी दुपारी ३:५० वाजताच्या सुमारास दोन बाटल्यांमध्ये डिझेल आणून अंगावर ओतत स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात हा युवक गंभीररीत्या भाजला आहे. पुणे येथील एका ३५ वर्षीय युवकाच्या पत्नीसह दोन मुलांना दहीगाव गावंडे येथील एका युवकाने पळवून नेले. त्याच्यावर कारवाई करून पत्नी व मुलांना परत आणून द्यावे, अशी या युवकाची मागणी होती.

स्वत: त्यानेसुद्धा कृषी नगर भागात पत्नी व मुलांचा शोध घेतला. परंतु त्याला ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे निराश झालेल्या युवकाने सोमवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या परिसरात येऊन सोबत दोन बाटल्यांमध्ये आणलेले डिझेल अंगावर ओतले आणि स्वत:ला जाळून घेत, तो पोलिस ठाण्यात दाखल झाला.

सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्याला तातडीने ताब्यात घेत, सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात युवक ४५ टक्के भाजल्याची माहिती असून, त्याचा जबाब तहसीलदारांनी नोंदविला आहे. त्यात त्याने दहीगाव गावंडे येथील युवकाने पत्नीसह त्याच्या दोन मुलांना पळवून नेल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी युवकाविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Bring the wife yes... Saying, he put diesel on his body and set it on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.