ब्रिटिशकालीन शकुंतला झाली ११० वर्षाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 05:12 PM2022-01-01T17:12:40+5:302022-01-01T17:12:49+5:30

British-era Shakuntala train turns 110 years old : गेली ३ वर्षे बंद असणारी अचलपूर-यवतमाळ 'शकुंतला' रेल्वे काल ११० वर्षांची झाली

British-era Shakuntala train turns 110 years old | ब्रिटिशकालीन शकुंतला झाली ११० वर्षाची

ब्रिटिशकालीन शकुंतला झाली ११० वर्षाची

Next

मूर्तिजापूर : पश्चिम विदर्भाचे भूषण व आदिवासी तसेच शेतकऱ्यांची लाईफलाईन आसणारी मात्र गेली ३ वर्षे बंद असणारी अचलपूर-यवतमाळ 'शकुंतला' रेल्वे काल ११० वर्षांची झाली, असून शकुंतला बचाव सत्याग्रहींनी 'शकुंतले'चा १०९ वा वाढदिवस आज पुष्पहार अर्पण करून व साडी-चोळीचा आहेर देऊन साजरा केला.
             ब्रिटिश कंपनी क्लिक निक्सन ने सुरु केलेल्या शकुंतला एक्सप्रेसला ११० व्या वर्षात पदार्पण केले. सद्यस्थितीत 'शकुंतले'ची झुक झुक थांबली आहे. परंतु तिच्या १ जानेवारी रोजी १०९ व्या वाढदिवसानिमित्त साडी चोळी देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. 
         प्रकाश बोनगिरे, प्रा.सुधाकर गौरखेडे, प्रा.अविनाश बेलाडकर, अजय प्रभे, मिलींद जामनिक, राजेंद्र कपिले आदी सत्याग्रही दुपारी १२ वाजता 'शकुंतला' लोकोशेड मध्ये पोचले. तेथील 'शकुंतले'च्या बंद अवस्थेतील इंजिनला पुष्पहार अर्पण केला व साडीचा आहेर आर्पण केला. प्लॕटफॉर्मवरील नामफलकालाही पुष्पहार अर्पण केला. ज्युनियर टेक्निशियन धिरज साळुंखे, रेल्वे पोलीस दलाचे एएसआय आर.एच. मेतकर, हेड पोलीस काॅन्स्टेबल निलेश पिंपळदे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक वाटाने, जयकुमार तायडे, प्रमोद ढोले यावेळी उपस्थित होते.
         १ जानेवारी शकुंतला रेल्वेचा १०९ वा  वाढदिवस, यवतमाळ ते अचलपूर रेल्वे मार्गावरील सर्व शकुंतला रेल्वे स्थानक सजवून, साजरा करण्याच्या ज्येष्ठ सत्याग्रही विजय विल्हेकर यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबाविण्यात आला.  

Web Title: British-era Shakuntala train turns 110 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.