भावसार समाजाचा उपवर वधू-वर परिचय मेळावा उत्साहात
By admin | Published: November 10, 2014 01:07 AM2014-11-10T01:07:20+5:302014-11-10T01:07:20+5:30
अकोला येथील मेळाव्यात १२८६ उपवर वधू-वर व त्यांचा पालकांचा सहभाग.
अकोला : भावसार समाजाचा उपवर वधू-वर परिचय मेळावा रविवार, ९ नोव्हेंबर रोजी मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. मेळाव्यात १२८६ उपवर वधू-वर व त्यांचे पालक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन भावसार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव पतंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष विश्वंभर ताकवाले, राज्याध्यक्ष देवराव फुलझेले, जिल्हाध्यक्ष मोहन नागलकर, अर्जुनकुमार गीते, राजेश कळमकर, प्रभाताई भावसार, शुभांगी खनके, डॉ. विजय जिराफे, राधा जिराफे, राजू महिंद्रकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ह्यरेशीम गाठीह्ण या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. यानंतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
दुपारच्या सत्रात उपवर वधू-वरांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणेश धारस्कार, विश्वंभर ताकवाले, प्रकाश खैरे, वसंतराव जुनगडे, दिवाकर साधकर व चंद्रकांत सावजी यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याचा समारोप विश्वंभर ताकवाले यांच्या भाषणाने झाला. संचालन रेखा येळणे यांनी, तर आभार शोभा परळीकर यांनी मानले.