आठ कोल्हापुरी बंधा-यांचे पितळ उघडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2017 02:45 AM2017-03-22T02:45:26+5:302017-03-22T02:45:26+5:30

समितीची संयुक्त पाहणी; एकाही बंधा-यात पाणी थांबतच नाही.

Broken brass of eight Kolhapuri bonded! | आठ कोल्हापुरी बंधा-यांचे पितळ उघडे!

आठ कोल्हापुरी बंधा-यांचे पितळ उघडे!

Next

अकोला, दि. २१- शेतीचे सिंचन वाढवून शेतकर्‍यांना मदत होण्यासाठी लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तरने तयार केलेले बंधारे डोकेदुखीच अधिक ठरले आहेत. प्रत्यक्ष भेटीत पाहणी केलेल्या कोणत्याही बंधार्‍यात पाणी थांबतच नसल्याची नोंद संयुक्त समितीने केली आहे. कोल्हापुरी बंधार्‍यांची सद्यस्थिती तपासून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरणासाठी संयुक्त समितीचा दौरा मंगळवारपासून सुरू झाला. यावेळी आठ बंधार्‍यांची पाहणी करण्यात आली. ह्यलोकमतह्णने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर समितीकडून ही तपासणी होत आहे.
गेल्या काही वर्षात १00 हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे जिल्हा परिषदेने लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर यांच्याकडे दिली. त्या ८४ पैकी केवळ १४ बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित कामे हस्तांतरित करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठपुरावा केला; मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही.
याबाबत ह्यलोकमतह्णने वृत्त लावून धरले. त्या बंधार्‍यांची तपासणी करण्यासाठी चार महिन्यांपर्यंत स्थानिक स्तरकडून माहितीच मिळाली नाही. बंधार्‍याचे सुरुवातीचे अंदाजपत्रक, त्यामध्ये झालेली वाढ, वाढीव निधीतून केलेले काम, त्यातून किती सिंचन वाढले, शेतकर्‍यांना कोणता लाभ झाला, या मुद्यांची माहिती मागवण्यात आली. ती देण्यासही उशीर झाला. त्यामुळे संयुक्त समितीचा दौरा सातत्याने पुढे ढकलला.

सहा गावांतील आठ बंधा-यांची पाहणी
संयुक्त समितीने हिंगणा-शेळद, धाडी-बल्हाडी-२, तांदळी, चिंचोली गणू, मळसूर, चान्नी या गावातील आठ कोल्हापुरी बंधार्‍यांची स्थळावर पाहणी केली. त्यामध्ये सिंचनापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवण्याला जबाबदार असलेल्या त्रुटी मोठय़ा प्रमाणात आढळल्या. दौर्‍यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.व्ही. देशमुख, स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता श्याम बोके, लघुसिंचनचे उपअभियंता पी.डब्ल्यू.तायडे, शाखा अभियंता आर.जे.गिरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बंधार्‍यांचे गेट गायब, स्लॅबही नाही
समितीने भेट दिलेल्या सर्वच बंधार्‍यांमध्ये पाणी थांबतच नाही. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. त्यामध्ये बंधार्‍यांत टाकण्यासाठी असलेले गेटच नादुरुस्त आहेत. काही ठिकाणी तर जाग्यावर ते उपलब्धही नाहीत. चान्नी बंधार्‍याला २४ गेट असताना केवळ १५ च आहेत.  गेटबाबत विचारणा केली असता, शेड मधे असल्याचे सांगण्यात आले; मात्र चावी नसल्याचे कारणही देण्यात आले. तांदळी येथे दुरुस्तीसाठी दहा लाख मिळाल्यानंतरही दुरुस्ती झाली नसल्याचे ग्रामस्थांनी समितीला सांगितले.

Web Title: Broken brass of eight Kolhapuri bonded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.