जीएमसीत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटांसाठी दलाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:20+5:302021-05-05T04:29:20+5:30

खाट रिक्त होण्यापूर्वीच खासगी डॉक्टरांना मिळते माहिती सर्वोपचार रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरील रुग्णाला इतर वॉर्डात हलविले किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्याने व्हेंटिलेटर ...

Brokerage for ventilators, oxygen beds from GM! | जीएमसीत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटांसाठी दलाली!

जीएमसीत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटांसाठी दलाली!

Next

खाट रिक्त होण्यापूर्वीच खासगी डॉक्टरांना मिळते माहिती

सर्वोपचार रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरील रुग्णाला इतर वॉर्डात हलविले किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्याने व्हेंटिलेटर रिक्त झाल्याची माहिती काही खासगी डॉक्टरांनाही कळत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आयसीयूतील खाट रिक्त होताच काही पैसे घेऊन खाट मिळवून देत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइक सांगत असल्याची माहिती आहे.

गरीब रुग्ण खाटेच्या प्रतीक्षेतच

सर्वोपचार रुग्णालयात खाटांसाठी सुरू असलेल्या दलालीमुळे गरीब रुग्णांना व्हेंटिलेटरच्या खाटांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. सर्वोपचार रुग्णालयात सुरुवातीपासून दाखल असलेल्या गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळणे अपेक्षित आहे; मात्र रिक्त झालेले व्हेंटिलेटर त्यांना न मिळता बाहेरून आलेल्या रुग्णांना दिले जात असल्याचे प्रकार सुरू आहेत.

सर्वोपचार रुग्णालयात पैसे घेऊन खाटा मिळवून देत असल्याचे काही जण रुग्णांच्या नातेवाइकांना सांगतात. ही नातेवाइकांची लूट असून, या प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. नातेवाइकांनी अशा व्यक्तींना बळी न पडता थेट सर्वोपचार रुग्णालयात येऊन खाटा रिक्त आहेत किंवा नाही, याची पुष्टी करावी.

- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला.

Web Title: Brokerage for ventilators, oxygen beds from GM!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.