पोलीस अधीक्षक कार्यालयपासून हाकेच्या अंतरावर सुरु होता देहव्यापार अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 06:04 PM2018-12-22T18:04:22+5:302018-12-22T18:04:48+5:30

अकोला : सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवराव बाबा चाळमध्ये सुरु असलेल्या ...

Brothel near SP office in akola unearth in police raid | पोलीस अधीक्षक कार्यालयपासून हाकेच्या अंतरावर सुरु होता देहव्यापार अड्डा

पोलीस अधीक्षक कार्यालयपासून हाकेच्या अंतरावर सुरु होता देहव्यापार अड्डा

Next


अकोला: सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवराव बाबा चाळमध्ये सुरु असलेल्या देहव्यापार अड्डयावर स्थानीक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने शनिवारी धाड टाकली. या अड्डयावरुन पती-पत्नी, एक ग्राहक आणि पिडीतेस ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुध्द सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवराव बाळा चाळमधील एका अपार्टमेंटजवळील घरात दुर्गेश राठोड त्याची पत्नी सुनंदा दुर्गेश राठोड हे दोघे जन देहव्यापार अड्डा चालवीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना मिळाली. या माहितीवरुन त्यांनी खात्री पटल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक आणि स्थानीक गुन्हे शाखेला माहिती देउन छापा टाकण्याचे निर्देश दिले. यावरुन सिटी कोतवाली पोलिस, स्थानीक गुन्हे शाखा व शहर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने संयुक्तरीत्या धाड टाकून दुर्गेश राठोड, त्याची पत्नी सुनंदा राठोड या दोघांसह एका पिडीत महिलेला ताब्यात घेतले. तर यावेळी उपस्थित असलेले ग्राहक रमेश सुर्यभाण चव्हाण रा. आदर्श कॉलनी, दुसरा ग्राहक सुशीलकुमार कमलकीशोर शर्मा रा. कोठारी वाटीका क्रमांक सहा मलकापूर या दोघांनाही अटक केली. या प्रकरणातील देहव्यापार अड्डा चालविणारे पती-पत्नी राठोड, ग्राहक शर्मा आणि चव्हाण या चार जनांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्यांची कारागृहात रवाणगी करण्यात आली आहे. तर पिडीतेची सुटका करण्यात आली आहे.

 

Web Title: Brothel near SP office in akola unearth in police raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.