मुर्तीजापूरात बीएसएनएलची केबल तुटली; बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 03:12 PM2019-01-16T15:12:15+5:302019-01-16T15:13:08+5:30

मूर्तिजापूर : शहरातील मुख्य रस्त्याचे काम चालू असून, या रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबी मशिनद्वारे भारत दुरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) नेटवर्क केबल जागोजागी तुटल्याने शहरातील अनेक बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत.

BSNL cable breaks; Banks' transaction stalled from two days | मुर्तीजापूरात बीएसएनएलची केबल तुटली; बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प

मुर्तीजापूरात बीएसएनएलची केबल तुटली; बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प

Next

मूर्तिजापूर : शहरातील मुख्य रस्त्याचे काम चालू असून, या रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबी मशिनद्वारे भारत दुरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) नेटवर्क केबल जागोजागी तुटल्याने शहरातील अनेक बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, ग्राहकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील सर्व बँकांनाबीएसएनएल मार्फत नेटवर्क सेवा पुरविली जाते. या नेटवर्कची केबल मुख्य रस्त्यावर जमिनीमध्ये गाडलेली आहे.परंतू मुख्य रस्त्याचे खोदकामाने ही केबल जागोजागी तुटल्याने इंटरनेट सेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे शहरातील सात - आठ बँंकांचे व्यवहार १५ जानेवरी पासून ठप्प झाले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती कायम राहिल्याने बँका व ग्राहकांना कोट्यावधीचे नुकसान सहन करावे लागले.
इंटरनेट खंडीत झाल्यामुळे कामकाज ठप्प पडलेल्या बँकांमध्ये बँक आॅफ महाराष्ट्र, अर्बन बँक, मलकापूर अर्बन, जनता बँक, एचडीएफसी, कॅनरा बँक यांचा समावेश आहे. बँकेचे नेटवर्क बंद झाल्याने चेक परत येणे, आरटीजीएस, क्लिअरन्स, पैसे टाकणे, काढणे यासारखे संपुर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. दोन दिवसाचे नुकसान दीड ते दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याची मोघम माहीती एका बँक अधिकाºयाने दिली.


मोजक्या बँकांचे व्यवहार सुरळीत
या दोन दिवसात मोजक्याच बँकेचे व्यवहार चालू असुन, या बँकांवर प्रचंड ताण आला आहे. यामध्ये व्हीसॅट यंत्रणेशी जोडल्या गेलेल्या बँकांचा व्यवहार सुरळीत असल्याचे समजते. सदर प्रकार हा जेसीबी मशीनने खोदकाम केल्याने झाला आहे.(शहर प्रतिनिधी)

 

Web Title: BSNL cable breaks; Banks' transaction stalled from two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.