‘बीएसएनएल’ची इंटरनेट सेवा चार दिवसांपासून विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 13:07 IST2018-10-01T13:07:18+5:302018-10-01T13:07:21+5:30
अकोला : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची अकोल्यातील इंटरनेट सेवा गत चार दिवसांपासून विस्कळीत असून, ग्राहक कमालीचे त्रासले आहेत.

‘बीएसएनएल’ची इंटरनेट सेवा चार दिवसांपासून विस्कळीत
अकोला : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची अकोल्यातील इंटरनेट सेवा गत चार दिवसांपासून विस्कळीत असून, ग्राहक कमालीचे त्रासले आहेत. बीएसएनएलच्या नेहमीच्या त्रासामुळे अनेक ग्राहक आता इतर पर्यायी सेवा घेत आहेत.
शहराच्या खोलेश्वर भागातील इंटक भवनाजवळ पाइपलाइन खोदण्याच्या कामात बीएसएनएलची मुख्य केबल तोडल्या गेली. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून नागरिकांनी बीएसएनएलकडे तक्रारी नोंदविल्या; मात्र या विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. इंटक कार्यालयाजवळच जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. शासकीय कार्यालयांची नेट सेवा खंडित होत असल्याने त्यांनादेखील खासगी कंपनीच्या आधाराने सेवा घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान, बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारपर्यंत सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते बोलले.