बीटीचे दोन लाख ६४ हजार पाकीट उपलब्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 03:21 PM2019-06-07T15:21:12+5:302019-06-07T15:21:18+5:30

अकोला: जिल्ह्याला ७ लाख २० हजार बीटी कपाशी पाकिटांची गरज आहे. तथापि, आतापर्यंत २ लाख ६४ हजार २९२ पाकिटे उपलब्ध झाली.

BT cotton's two lakh 64 thousand wallets available! | बीटीचे दोन लाख ६४ हजार पाकीट उपलब्ध !

बीटीचे दोन लाख ६४ हजार पाकीट उपलब्ध !

Next

अकोला: जिल्ह्याला ७ लाख २० हजार बीटी कपाशी पाकिटांची गरज आहे. तथापि, आतापर्यंत २ लाख ६४ हजार २९२ पाकिटे उपलब्ध झाली. शासनाने बीटी बियाणे विक्रीची परवानगी देताच बाजारात विविध कंपन्यांचे बियाणे विक्रीस आले. दरम्यान, यावर्षी पावसावरच कपाशीची पेरणी अवलंबून आहे.
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शासनाने पूर्व हंगामी कपाशीची पेरणी टाळावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. याच अनुषंगाने मे महिन्यात बियाणे विक्रीवर कंपन्यांना बंदी घालण्यात आली होती. १ जूनपासून ही बंदी उठविण्यात आली आहे; पण अद्याप पूरक बियाणे उपलब्ध झाले नाही. पूरक पाऊस झाल्यानंतरच शेतकरी बियाणे खरेदीला सुरुवात करतात. यावर्षीही दमदार पावसानंतरच शेतकरी बियाणे खरेदी करतील, तोपर्यंत संपूर्ण बियाणे बाजारात येईल, असे कृषी विभागाचे म्हणने आहे.

Web Title: BT cotton's two lakh 64 thousand wallets available!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.