पूरग्रस्तांना सानुग्रह मदतीसह घरकुल बांधून द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:43+5:302021-08-18T04:24:43+5:30
अकोला : शहरातील कैलास टेकडी, महात्मा फुले नगर, निमवाडी परिसरातील पूरग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून, घरांचे नुकसान झालेल्या पूरग्रस्त कुटुंबांना ...
अकोला : शहरातील कैलास टेकडी, महात्मा फुले नगर, निमवाडी परिसरातील पूरग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून, घरांचे नुकसान झालेल्या पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने सानुग्रह मदत आणि घरकुल बांधून देण्याची मागणी करीत अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
गत २१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोर्णा नदीपात्राजवळ असलेल्या शहरातील कैलास टेकडी, महात्मा फुले नगर, निमवाडी परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने, अनेक घरांचे आणि घरातील वस्तूंचे नुकसान झाले. परंतु अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात मात्र टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पूरग्रस्त कुटुंबांना सानुग्रह मदत देण्यात यावी, घरांचे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना घरकुल बांधून देण्यात यावे. तसेच वीजबिल माफ करण्यात यावे, अशा मागण्या करीत अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन तायडे यांच्यासह गजानन दांडगे, वैशाली बागडे, वंदना आठवले, शशिकला वानखडे, ज्योती ताजने, छाया मेडे, मीना शामस्कर , काजल अरखराव आदी उपस्थित होते.
.....................फोटो...................