कॅन्सरविरोधात लढा देण्यासाठी रुग्णालयांचे जाळे उभारणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:23 AM2018-12-04T05:23:32+5:302018-12-04T05:23:49+5:30

उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक कॅन्सर रुग्ण महाराष्ट्रात आहेत. विदर्भ व मराठवाड्यात कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे.

To build a network of hospitals to fight against cancer - Chief Minister | कॅन्सरविरोधात लढा देण्यासाठी रुग्णालयांचे जाळे उभारणार - मुख्यमंत्री

कॅन्सरविरोधात लढा देण्यासाठी रुग्णालयांचे जाळे उभारणार - मुख्यमंत्री

Next

अकोला : उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक कॅन्सर रुग्ण महाराष्ट्रात आहेत. विदर्भ व मराठवाड्यात कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे राज्यभरात कॅन्सर रुग्णालयांचे जाळे (ग्रीड) उभारणार असून, जे रुग्णालये सामाजिक दायित्वाची भावना ठेवून सेवा देतात त्यांना शासन सर्वोतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
रिलायन्स समूहाने अकोला शहरानजिक असलेल्या रिधोरा येथे उभारलेल्या कॅन्सर केअर या हॉस्पिटलचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. या वेळी ते बोलत होते. उद्घाटनाला रिलायन्स हॉस्पिटलच्या चेअरपर्सन टिना अंबानी उपस्थित होत्या.

Web Title: To build a network of hospitals to fight against cancer - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.