शांतीविजय लाॅजची इमारत शिकस्त; मनपाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:14 AM2021-06-29T04:14:18+5:302021-06-29T04:14:18+5:30
शहरात दरवर्षी पावसाळ्यात जीर्ण झालेल्या शिकस्त इमारतींचा मुद्दा उपस्थित हाेताे. शहरात सर्वाधिक शिकस्त इमारती पश्चिम व उत्तर झाेनमध्ये आहेत. ...
शहरात दरवर्षी पावसाळ्यात जीर्ण झालेल्या शिकस्त इमारतींचा मुद्दा उपस्थित हाेताे. शहरात सर्वाधिक शिकस्त इमारती पश्चिम व उत्तर झाेनमध्ये आहेत. त्यानंतर पूर्व झाेनचा क्रमांक लागताे. शहराची संपूर्ण बाजारपेठ मध्यवर्ती भागातील उत्तर झाेनमध्ये एकवटली असून, नेमक्या याच ठिकाणी जुन्या व शिकस्त इमारतींची संख्या जास्त आहे. ताजनापेठ परिसरातील किराणा बाजारात शांतीविजय लाॅजची दुमजली इमारत जीर्ण झाल्यामुळे महापालिकेच्या उत्तर झाेनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते यांनी मगनलाल दाेषी व इतरांना इमारत पाडण्याची नाेटीस बजावली. तसेच साेमवारी इमारत ताेडण्याला प्रारंभ केला. यावेळी इमारतीमध्ये दुकान व्यावसायिक असल्याने या कामासाठी मालमत्ताधारकांनी स्वत:हून वेळ मागितला. तसेच स्वत:च्या जबाबदारीवर इमारत ताेडणार असल्याचे मनपाला लेखीपत्राद्वारे कळविले. त्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने इमारत ताेडताना सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश मालमत्ताधारकास देऊन मुदत दिली.