बुलडाणा जिल्हा बँकेला पॅकेज मिळणार

By admin | Published: November 6, 2014 12:00 AM2014-11-06T00:00:37+5:302014-11-06T00:00:37+5:30

केंद्र सरकार अनुकूल : मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीवर चर्चा

Buldana District Bank will get package | बुलडाणा जिल्हा बँकेला पॅकेज मिळणार

बुलडाणा जिल्हा बँकेला पॅकेज मिळणार

Next

बुलडाणा : डबघाईस आलेल्या जिल्हा बँकेमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी व ठेवीदारांना केंद्र सरकार दिलासा देण्याच्या मानसिकतेत असून बँकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पॅकेज देणार असल्याची माहिती आमदार पांडुरंग फुंडकर यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना दिली.
आज दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अडचणीत आलेल्या जिल्हा बँकांचा प्रश्न उपस्थित केला. विदर्भातील वर्धा, नागपूरसह बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँका सध्या शेवटच्या घटका मोजत असून, बुलडाण्याच्या बँकेवर प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. या बँकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पॅकेज देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या बँकांचे पुनरुज्जीवन झाल्यास सहकार क्षेत्राला नव्याने बळकटी येईल तसेच शेतकर्‍यांना विविध योजनांचा लाभ तातडीने देणे शक्य होईल. त्यामुळे या बँकांना पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीला केंद्रीय मंत्रिमंडळाने अनुकूलता दाखविली असल्याची माहिती आ. फुंडकर यांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारनेही जिल्हा बँकेला मदत देऊ केली होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने त्या कालावधीत बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला. या कारणामुळे सदर मदतीचा अध्यादेश हा वादाचा ठरला. १२८ कोटी रुपयांची असलेली ही मदत कोर्टाच्या तारखांमध्ये अडकली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविरोधात जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाने कोर्टात दाद मागितली होती. मात्र, या मदतीच्या अध्यादेशात जर बँक सुरळीत असेल, तर मदत दिली जाईल, असे नमूद केले असल्याने मदतीची आशा मावळली होती. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे आता पुन्हा बँक सुरळीत होण्याची आशा पल्लवित झाली आहे.

Web Title: Buldana District Bank will get package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.