पहिल्या डावाच्या आघाडीवर बुलडाणा संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:58 AM2017-10-24T01:58:19+5:302017-10-24T01:59:08+5:30
अकोला: यवतमाळ संघाने काल आपल्या दुसर्या डावाला सुरुवात करू न दिवसअखेर ७ षटकात १४ धावा केल्या होत्या. आज सोमवारी सलामीची जोडी लोकेश पाटकोटवार नाबाद १0 धावा, तर श्रीकांत खरडेने नाबाद 0३ धावांवर खेळ पुढे सुरू केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: यवतमाळ संघाने काल आपल्या दुसर्या डावाला सुरुवात करू न दिवसअखेर ७ षटकात १४ धावा केल्या होत्या. आज सोमवारी सलामीची जोडी लोकेश पाटकोटवार नाबाद १0 धावा, तर श्रीकांत खरडेने नाबाद 0३ धावांवर खेळ पुढे सुरू केला. लोकेशने केवळ १ धाव काढून मैदान सोडले, तर श्रीकां तने अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत ७४ धावांचे योगदान दिले. मात्र, श्रीकांतचे प्रयत्न निष्फळ ठरवित, बुलडाणा संघाचा वेगवान गोलंदाज पुरू षोत्तम खांडेभराड याने ११ षटकात २७ धावा देत तब्बल ६ गडी झटपट बाद करू न यवतमाळ संघाला आपला डाव लवकरच गुंडाळायला भाग पाडले.
यवतमाळ संघाने ३0 षटकात सर्वबाद १३९ धावा काढल्या. बुलडाणाच्या रामेश्वर सोनुने व ऋषिकेश पवार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. गोपाळ नीळे याला २ गडी बाद करण्यात यश मिळाले, तर पुरू षोत्तम खांडेभराडने सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन करीत तब्बल ६ गडी तंबूत पाठविले. यामुळे बुलडाणा संघाला पहिल्या डावाच्या आघाडीवर सहज विजय मिळविता आला. बुलडाणा संघाने ४७ धावांची आघाडी घेतली. बुलडाणाने पहिल्या डावात ५0.३ षटकात सर्वबाद २९६ धावांचा डोंगर रचला होता. कर्णधार निखिल भोसलेने चौकार आणि षटकारांची फटकेबाजी करीत शतक (११0 धावा) झळकाविले, तर तुषार रिंदे याने अर्धशतक (५८ धावा) पार केले होते.
तसेच रामेश्वर सोनुने याने यवतमाळ संघाचे ५ गडी बाद केले होते. दिवेकर मैदान अकोला जिमखाना येथे घेण्यात आलेल्या या सामन्यात पंच म्हणून अनिल एदलाबादकर व संजय बुंदेले यांनी काम पाहिले. गुणलेखन निखिल लखाडे याने केले. विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर व जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. खैरागड चषक क्रिकेट स्पर्धेतील हा चौथा सामना होता.