बुलेट गँगच्या म्होरक्याला बेड्या, अलंकार मार्केटमधील ८ चोऱ्यांचा छडा

By सचिन राऊत | Published: March 24, 2024 08:38 PM2024-03-24T20:38:55+5:302024-03-24T20:39:14+5:30

जिल्ह्यातील सहा गुन्हयांसह १७ चाेऱ्यांचा पर्दाफाश.

Bullet Gang Leader Shackled 8 Thieves At Alankar Market | बुलेट गँगच्या म्होरक्याला बेड्या, अलंकार मार्केटमधील ८ चोऱ्यांचा छडा

बुलेट गँगच्या म्होरक्याला बेड्या, अलंकार मार्केटमधील ८ चोऱ्यांचा छडा

अकाेला : अलंकार मार्केटमधील सात ते आठ दुकानांचे शटर उचलून लाखाे रुपयांचा मुद्देमाल चाेरी करणाऱ्या बुलेट गॅंगमधील मुख्य आराेपीस अटक करण्यात स्थानीक गुन्हे शाखेला यश आले आहे. या चाेरटयांनी अकाेल्यातीलच सात ते आठ दुचाक्या चाेरी करुन याच दुचाक्यांचा वापर करीत अलंकार मार्केटमध्ये चाेरी केली हाेती. त्यानंतर दाेन दुचाक्या घेउन मुूद्देमालासह हे चाेरटे पसार झाले हाेते.


अलंकार मार्केटमधील सात ते आठ दुकानात चाेरी झाल्याची घटना घडली हाेती. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून आराेपीचा शाेध सुरु केला. पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख शंकर शेळके यांना तपासाचे निर्देश दिले. यावरुन स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रीक विश्लेषन करून संशयावरून हैद्राबाद येथील एकाची चाैकशी केली. त्याच्याकडून मीळालेल्या माहीतीवरुन पाच संशयीतांची झडती घेतल्यानंतर हैद्राबाद येथीलच रहीवासी फरहान अहेमद अब्दुल गफार वय ३० वर्ष यास ताब्यात घेतले. त्याची कसून चाैकशी केली असता त्याने या चाेऱ्यांची कबूली दिली. यासाेबतच त्याने आकाेट फैल व जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतही चाेरी केली असून या चाेऱ्यातील एक लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अकाेला जिल्हयातील सहा व हींगाेली, नागपूर ग्रामीण यासह विविध ठिकाणी अशाच प्रकारे केलेल्या १७ चाेऱ्यांचा उलगडा या चाेरटयाकडून झाला आहे. स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला या चाेरटयास अटक करून उर्वरीत चाेऱ्यांचा छडा लावण्यात माेठे यश आले आहे. ही कारवाइ पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, स्थानीक गुन्हे शाखा प्रमख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पाेलिस उपनिरीक्षक गाेपाल जाधव, राजेश जवरे, फीराेज खान, खुशाल नेमाडे, महेंद्र मलीये, आकाश मानकर, अभीषेक पाठक, धीरज वानखडे, प्रशांक कमलाकर, अक्षय बाेबडे, राहुल गायकवाड, रविंद्र खंडारे, अविनाश पाचपाेर, प्रमाेद डाेइफाेडे यांनी केली.

Web Title: Bullet Gang Leader Shackled 8 Thieves At Alankar Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला