सराफा, सनदी लेखापाल कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:11+5:302021-05-05T04:31:11+5:30
अकोला : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निर्गमित करण्यात आलेले आदेश कायम ठेवून कॉमन सर्व्हिस सेंटर, सनदी लेखापाल व सराफा व्यापाऱ्यांना ...
अकोला : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निर्गमित करण्यात आलेले आदेश कायम ठेवून कॉमन सर्व्हिस सेंटर, सनदी लेखापाल व सराफा व्यापाऱ्यांना दुकान उघडून तपासणी करण्याकरिता २६ मे रोजीचे सकाळी सात वाजेपर्यंत सशर्त सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
काेराेनाच्या वाढत्या प्रसारामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामुळे कॉमन सर्व्हिस सेंटर, सनदी लेखापाल व सराफा यांना काही काळासाठी सवलत देण्याची मागणी हाेत हाेती. त्याची दखल घेत अकोला महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत, सनदी लेखापाल यांचे कार्यालयांना सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत तर सराफा व्यापाऱ्यांना दुकान उघडून तपासणी करण्याकरिता गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.
आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला, मनपाचे आयुक्त, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी करावी, असे आदेशात नमूद केले आहे.