एक्सप्रेसच्या धडकेनंतरही वळू सुखरूप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 12:16 AM2016-06-22T00:16:20+5:302016-06-22T00:16:20+5:30
अकोला जिल्ह्यातील सायखेड येथील घटना.
सायखेड (जि. अकोला) : गेल्या अनेक वर्षापासून कर्मयोगी संत भगत महाराज यांच्या नावाने सोडून दिलेला वळू हा सायखेड शिवारात रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव येणार्या एक्सप्रेसच्या धडकेने फेकल्या गेला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली व जखमी झालेल्या वळुला ४0 ते ५0 ग्रामस्थांनी ट्रॅक्टरमध्ये टाकून चोहोगावच्या भगत महाराज मंदिराजवळ आणले. पशुचिकित्सकांना बोलावून जखमेवर त्वरित उपचार केला व वळूचा जीव वाचविला.
१८ जूनच्या सकाळी ११.३0 वाजताचे सुमारास पूर्णा ते अकोला ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर भरधाव जाणार्या पुणे ते अमरावती एक्सप्रेसने या वळुला सायखेड शिवारात धडक दिली होती. विशेष म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवा करणयाचे महान कार्य करणार्या चोहोगावच्या संत भगत महाराजांच्या नावाने सोडलेला हा वळू सुखरूप असल्याने ग्रामस्थांना ह्यदेव तारी त्याला कोण मारीह्ण असा प्रत्यय आला.