डेंग्यूच्या एलायझा चाचणीचा भार अकोल्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:23 AM2021-09-14T04:23:06+5:302021-09-14T04:23:06+5:30
डेंग्यूच्या रुग्णांवर संदिग्ध रुग्ण म्हणूनच उपचार अकोल्यासह विभागातील बहुतांश खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांची प्राथमिक चाचणी करून त्यांच्यावर डेंग्यूसदृश रुग्ण ...
डेंग्यूच्या रुग्णांवर संदिग्ध रुग्ण म्हणूनच उपचार अकोल्यासह विभागातील बहुतांश खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांची प्राथमिक चाचणी करून त्यांच्यावर डेंग्यूसदृश रुग्ण म्हणूनच उपचार केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यूचा आकडा कमी दिसत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दिवसाला केवळ १८० चाचण्यांची क्षमता
अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी एकाच वेळी करण्याची सुविधा उपलब्ध आहे, मात्र त्याची क्षमता मर्यादित आहे. दिवसाला डेंग्यूच्या १८०, तर मलेरियाच्या १८० चाचण्या शक्य आहेत. तुलनेने चाचणीसाठी येणाऱ्या नमुन्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.
सर्वाधिक रुग्ण अमरावती जिल्ह्यात विभागात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण अमरावती जिल्ह्यात आढळून आले. त्या तुलनेत इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे ३३१, अकोल्यात ५, बुलडाणा जिल्ह्यात केवळ सात रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अमरावतीप्रमाणेच इतर जिल्ह्यातही डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या जास्त आहे; मात्र त्या रुग्णांची नोंद घेतली जात नसल्याची चित्र आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.