अकोल्यात कोरोनाबधित व्यक्तीच्या निवासस्थानी लाखोंची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 04:43 PM2020-04-08T16:43:29+5:302020-04-08T16:43:38+5:30
अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल पळविला असून या चोरीमुळे पोलिसांच्या नाकेबंदी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैदपुरा येथील रहिवासी तसेच आर्टिफिशियल फ्लॉवर डेकोरेशन चे काम करणाऱ्या व्यक्तीस मंगळवारी सायंकाळी कोरोना झाल्याच्या निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करताच त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिराच्या सुमारास घरफोडी झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल पळविला असून या चोरीमुळे पोलिसांच्या नाकेबंदी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
राज्यभरात कोरोना या संसर्गजन्य विषाणूंनी बाधित केलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहेत. एक महिन्यापासून सेफ झोनमध्ये असलेल्या अकोला शहरातही कोरोना चा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. हा रुग्ण दिल्ली येथून पंधरा दिवसांपूर्वी अकोल्यात परतला होता. फ्लावर डेकोरेशन चे कामकाज करणारे या कुटुंबतील कोरोनाबधित रुग्ण दिल्ली येथून साहित्य घेऊन परतल्यानंतर त्यांना ३ एप्रिल रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांना कोरुना संसगार्ची लक्षणे दिसल्याने त्यांच्या स्वबचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. दरम्यान या नमुन्यांचा अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त होताच त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाने अकोल्यातील कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची जाहीर केले. त्यानंतर बैदपुरा परिसरातील तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला. तर कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री उशिराच्या सुमारास त्यांच्या घरी हैदोस घालत लाखो रुपयांची घरफोडी केली. त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम व मुद्देमाल पळविण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हा परिसर सील केला असून पोलिसांची ही मोठी नाकेबंदी या परिसरात लावण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल पलवील्याने आरोग्य विभागाच्या सीलबंद कारवाईवर तसेच पोलिसांच्या बंदोबस्तावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून कोरोणाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतरही आरोग्य विभाग तसेच पोलिस प्रशासन गंभीर नसल्याचे या चोरीच्या घटनेवरून दिसून येत आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. तर सदर कुटुंबीय सर्वोपचार मध्ये दाखल असल्याने त्यांच्या घरी नेमकी किती रुपयांची घरफोडी झाली हे अद्याप समोर आले नाही.