गजानन नगरात घरफोडी; तीन लाखांचे दागिने लंपास
By admin | Published: April 18, 2017 01:43 AM2017-04-18T01:43:47+5:302017-04-18T01:43:47+5:30
अकोला : डाबकी रोडवरील गजानन नगरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.
अकोला : डाबकी रोडवरील गजानन नगरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गजानन नगरात राहणाऱ्या शारदा अरुण पाटील यांच्या तक्रारीनुसार, काही दिवसांपासून कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि एका खोलीतील कपाटात ठेवलेले सोने, चांदीचे दागिने व रोख २ हजार रुपये लंपास केले.
या दागिन्यांची किंमत १ लाख ८५ हजार ३५४ रुपये आहे. पाटील कुटुंबीय सकाळी घरी परतल्यावर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले.
घरफोडीची घटना घडल्यावर पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. शारदा पाटील यांच्या तक्रारीनुसार डाबकी रोड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला.
शाळेतूनही इलेक्ट्रॉनिक्स साहित्य लंपास
डाबकी रोडवरील भिरडवाडी परिसरातील संताजी इंग्रजी प्राथमिक शाळेतसुद्धा चोरट्यांनी चोरी करून लॅपटॉपसह सीसी कॅमेऱ्याची मशीन, एलईडी, माईक, स्पीकर, इर्न्व्हटर आदी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य लंपास केले. या साहित्याची किंमत ६२ हजार रुपये आहे.