पोलिस अधिकाऱ्याच्या घरी झालेल्या चोरीचा पदार्फाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:47 PM2020-04-28T17:47:07+5:302020-04-28T17:47:14+5:30
चोरटयांकडून ७५ ग्रॅम सोने व २० ग्रॅम चांदीचे दागीणे जप्त करण्यात आले आहेत.
अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात असलेल्य कोठारी वाटीका क्रमांक ४ मध्ये रहिवासी असलेल्या महिला साहायक पोलिस निरीक्षक यांच्या निवासस्थानी तब्बल चार लाखांची चोरी करणाºया दोन अल्पवयीन चोरटयांना स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ यांच्या मार्गदर्शनातील पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. दोन्ही चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधार गृहात रवाणगी करण्यात आली असून या चोरटयांकडून ७५ ग्रॅम सोने व २० ग्रॅम चांदीचे दागीणे जप्त करण्यात आले आहेत.
महिला साहायक पोलिस निरीक्षक विणा राहुल भगत या प्रसुती रजेवर असून कोठारी वाटीका क्रमांक ४ मधील वैभव रेसीडन्सी येथे राहावयास आहेत. मात्र रविवार २९ मार्चच्या आसपास अज्ञात चोरटयांनी त्यांच्या या निवासस्थानाचे कुलुप चाबीने उघडून घरात प्रवेश केला होता. त्यानंतर घरातील कपाटातील रोख ९६ हजार रुपये, सोन्याचे दागीने १३ तोळे असा एकून चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. विणा यांचे पती राहुल भगत यांचा बांधकाम व्यावसाय असून त्यांची आई व वडील दोघेही मोठी उमरी येथे राहत असल्याने ते दोघेही आई वडीलांकडे गेलेले असतांना अज्ञात चोरटयांनी ही चोरी केली होती. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला तसेच स्थानीक गुन्हे शाखेनेही या चोरटयांचा शोध सुरु केल्यानंतर दोन विधीसंघर्ष बालकांनी ही चोरी केल्याचे उघडकीस आले. यावरुन पोलिसांनी सदर दोन अल्पवयीन चोरटयांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैेलेष सपकाळ व त्यांच्या पथकाने केली.