मळसूर येथे घरफोडी ; दीड लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 06:27 PM2019-09-29T18:27:18+5:302019-09-29T18:27:32+5:30
अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी २९ सप्टेंबर रोजीच्या सकाळी उघडकीस आल्याने गावासह एकच खळबळ उडाली आहे.
खेट्री /मळसुर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत मळसूर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी २९ सप्टेंबर रोजीच्या सकाळी उघडकीस आल्याने गावासह एकच खळबळ उडाली आहे. मसूर येथील अल्पभूधारक शेतकरी मेहबूब बॅग हातम बॅग, यांच्या मुलाचा विवाह गेल्या चार महिन्यापूर्वी झाला होता. सुन व मुलांसाठी लागणारे सोन्या-चांदीचे दागिन्यांची विक्री केली होती. परंतु २८ सप्टेंबर रोजी च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या सोना चांदी व रोकडवर हात साफ करून एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच अज्ञात चोरट्यांनी या घरफोडी करण्याआधी मळसुर येथील विनोद राऊत, जी टी राखोंडे गुरुजी, या दोघांच्या घरामध्ये प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते प्रयत्न फसला. नंतर अज्ञात चोरट्यांनी महबूब बेग यांच्या घरावर धाव घेतली आणि सोना चांदी व रोकड असे एकूण एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यापूर्वीसुद्धा मागील वर्षी मळसुर येथे सरपंच जगदीश देवकते, गजानन राखोंडे, शंकर चव्हाण, बद्री कलंत्री, आधी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. मेहबूब बेग यांच्या घरी धाडसी चोरी झाल्याची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि त्याच रात्री दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रामराव राठोड करीत आहे.